KK: गायक केकेच्या अचानक जाण्याने संगीत क्षेत्र हळहळले ; पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यासह अनेक कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली.

| Updated on: Jun 01, 2022 | 1:21 PM

केके यांच्या अचानक जाण्याने निधनाने संपूर्ण संगीत (Music)क्षेत्रात शोककळा पसरली आहे. देशभातातील लाखो चाहत्यांना त्याच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. अनेका कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत आपल्या भावना वाट मोकळी करून दिलेली  आहे.

KK: गायक केकेच्या अचानक जाण्याने संगीत क्षेत्र हळहळले ; पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यासह अनेक कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली.
kk
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके) (Krishnakumar Kunnath)यांचे वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका मैफिलीत परफॉर्म करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले . तेथून हॉटेलमध्ये परतल्यानंतर हृदयविकाराचा झटका(Heart attack) आला. आणि ते खाली कोसळला. घटनेननंतर तातडीनं त्याना रात्री 10.30 च्या सुमारास त्यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएमआरआय) नेण्यात आले,. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके यांच्या अचानक जाण्याने निधनाने संपूर्ण संगीत (Music)क्षेत्रात शोककळा पसरली आहे. देशभातातील लाखो चाहत्यांना त्याच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. अनेका कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत आपल्या भावना वाट मोकळी करून दिलेली  आहे.

पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

प्रसिद्ध पार्श्वगायक केके यांनी पंतप्रधान ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहेकी , “केके म्हणून प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले. त्याच्या गाण्यांमध्ये भावनांच्या विस्तृत श्रेणीचे चित्रण केले गेले आहे, ज्याचा परिणाम सर्व स्तरांवर झाला आहे. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो.

गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून गायकाला श्रद्धांजली अर्पण केली, ‘केके हे अतिशय प्रतिभावान आणि बहुमुखी गायक होते. त्यांच्या अकाली निधनाने भारतीय संगीताचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या तेजस्वी आवाजाने त्यांनी असंख्य संगीतप्रेमींच्या मनावर अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना. ओम शांती शांती’

 

सलीम मर्चंट यांनी व्यक्त केले दुःख

केकेच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. सलीम मर्चंटने आपले दु:ख व्यक्त करत म्हटले आहे की , केके माझ्याकडे दुःख व्यक्त करायला शब्द नाहीत, तुझ्या अचानक जाण्याने मी तुटलोय… तू शेवटच्या दिवसापर्यंत अगदी मनापासून गायलास …

विशाल डडलानी बसला धक्का

गायक केके यांच्या निधनाची बातमी ऐकून विशाल डडलानी यांना मोठा धक्का बसला आहे. गायकाने ट्विटवर लिहिले, ‘हे खरे असू शकत नाही. केके तुझ्याशिवाय काहीच होणार नाही, काहीही नाही. माझे मन दुःखी झाले आहे. शुद्धतेचा आवाज, सभ्यतेचा दयाळूपणा,सह्दयी असलेला व्यक्ती आपल्यात नाही.

अक्षय कुमार यांनी श्रद्धांजली वाहिली

अभिनेत्याने ट्विट करत आपली सहवेदना व्यक्त केली आहे, ‘केके यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख आणि धक्का बसला. हे मोठे नुकसान आहे ! ओम शांती’

गायक राहुल वैद्य यांना धक्का

गायक राहुल वैद्य यांच्या निधनाने धक्का बसला आहे. त्याने ट्विट करत म्हटले आहे की, ‘गायक केके कधीही धूम्रपान किंवा दारूपिली नाही! सर्वात साध कुठल्याही प्रकारचे वाद जीवन ते जगले नाहीत, मीडियाच्या प्रसिद्धीपासून कायम अलिप्ट राहिले. मी जेव्हा-जेव्हा भेटलो तेव्हा ते खूप प्रेम आणि दयाळूपणे माझे स्वागत केले. ही घटना अंत्यत अन्यायकारक आहे.

श्रेया घोषाल यांनी  केले ट्विट 

गायक केकेच्या निधनाच्या बातमीने दु:खी झालेल्या श्रेया घोषालने लिहिले, ‘मला काहीच समजत नाही. मी सुन्न झालो आहे #KK का? ! हे स्वीकारणे खूप कठीण आहे! हृदय तुटले आहे असे तिने म्हटले आहे.

मोहित चौहानने शेअर केला केकेसोबतचा  फोटो  

गायक केके सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत मोहित चौहानने लिहिले, ‘केके…हे तू बरोबर केले नाहीस ही तुझी जायची वेळ नव्हती.हे शेवटची भेट होती जेव्हा आपण सहलीचं नियोजन केलं होत. तू असा कसा जाऊ शकतो. आज एक मित्र, एक भाऊ सोडून गेला.

विवेक अग्निहोत्री यांनी शोक व्यक्त केला

दिग्दर्शकाने लिहिले, ‘केकेच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. माझ्या पहिल्या चित्रपटाचे पहिले गाणे त्यांनी गायले. तेव्हापासून एक चांगला मित्र. एवढ्या लवकर का, केके, का? पण तुम्ही प्लेलिस्टची संपत्ती मागे ठेवली आहे. खूप कठीण रात्र , शांतता , केकेसारखे कलाकार कधीच मरत नाहीत.

नील नितीन मुकेश आठवतोय के.के

अभिनेत्याने लिहिले की, ‘खूप अस्वस्थ करणारी आणि धक्कादायक बातमी, आमच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक, सर्वांचे लाडके केके आता आमच्यात नाहीत. त्यांच्या गाण्यांनी त्यांना अजरामर केले आहे. तो सदैव आपल्या हृदयात राहील ️??. आमच्या न्यूयॉर्क चित्रपटातील त्यांचे ‘जुनून’ हे गाणे आजही प्रेम आणि स्वप्नांची आशा घेऊन येते.