मुंबई : जेव्हा आपण टीव्ही पाहता तेव्हा कोणत्याही कार्यक्रमाचा भाग काही मिनिटांतच संपतो. परंतु, हाच भाग चित्रित करण्यासाठी काही तास नाही, तर कित्येक दिवसदेखील लागतात. आवडत्या मालिका बघत असताना, हे चित्रीकरण नेमके कसे होते? कलाकारांचे कपडे कुठून येतात? किंवा त्यांना किती पैसे मिळतात?, याविषयीचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तुमच्या मनातही जर असे प्रश्न असतील तर, आज आम्ही आज तुम्हाला याची उत्तरे सांगणार आहोत (Know about TV serials shooting).
जर आपण चित्रीकरणाचा विचार केला तर, तर टीव्ही इंडस्ट्रीतील शूटिंगची शैली चित्रपटापेक्षा खूप वेगळी आहे. टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. यावेळी नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी आम्ही टीव्ही अभिनेत्री गीतांजली मिश्राशी संवाद साधला. त्यांनी अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. चला तर, जाणून घेऊया टीव्ही शूटिंगबद्दल त्यांनी काय सांगितले…
‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री गीतांजली म्हणाल्या, ‘हे त्या मालिकेवर अवलंबून आहे. ज्या मालिका डेली सोप आहेत, त्यांचे शूट बहुतेक इनडोअर असते. त्यामुळे चित्रिकरणाचे लोकेशन एकच तसेच, तिथेच प्रकाश योजना केलेली असते. तीन कॅमेऱ्यांचे शूटिंग सुरू झाले की, एका दिवसात एका भागाचे चित्रीकरण आरामात पार पडते. तर, ‘नागिन’सारख्या मालिकांच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी 3 ते 4 दिवस लागतात. कारण यात व्हीएफएक्सवरही काम केले जाते. दुसरीकडे, क्राइम पेट्रोल सारख्या शोच्या चित्रीकरणाला बराच वेळ लागतो, कारण त्यामध्ये आउटडोअर शूट अधिक असते.
आठवड्यातून 5 ते 6 दिवस टेलीव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांचे चित्रीकरण सतत सुरु असते. यामुळे, केवळ दोन-तीन दिवसांचे भाग बॅकअपमध्ये राहतात. पण, पात्रं जास्त असतील तर शूटिंग थांबत नाही. म्हणून त्यांना एपिसोड कमी पडण्याची समस्या येत नाही.
अभिनेत्री म्हणते, ‘चित्रपटाची स्क्रिप्ट बर्याच महिन्यांपूर्वी लिहिलेली असते. पण संवाद हे चित्रीकरणाच्या दिवशीच मिळतात. त्याच दिवशी सीन फायनल केले जातात. ही सगळी प्रक्रिया टीआरपी आणि चॅनेलच्या धोरणावर अवलंबून असते. त्यामुळे त्यात दररोज हे बदल केले जातात. अशा परिस्थितीत टीव्ही मालिकांचे शुटिंग हे चित्रपटांपेक्षा खूप वेगळे आहे. चॅनेल प्रत्येक आठवड्याच्या टीआरपी आकड्यांच्या आधारे पुढील आठवड्यातील कामाचा निर्णय घेते (Know about TV serials shooting).
टीव्ही मालिकेतील पात्रांचे कपडे प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने दिले जातात. प्रॉडक्शन हाऊस कपडे भाड्याने घेते आणि ते अभिनेत्री किंवा अभिनेत्यास त्या भागापुरते दिले जातात. अभिनेत्रींचे पोशाख हे कॉमन आकाराचे असतात. शूटिंगपूर्वी अभिनेत्रींच्या सोयीनुसार अल्टर केले जातात. कधीकधी एखादे पात्र केवळ एकाच दिवसापुरते असते, अशावेळी त्यांना स्वतःचे कपडे आणण्यास देखील सांगितले जाते. बऱ्याचदा प्रॉडक्शन हाऊसमधूनच कपडे उपलब्ध करून दिले जातात. मालिकेचे सर्वाधिक बजेट हे कपड्यांवरच खर्च होते.
गीतांजली म्हणतात, ‘मालिकेचे चित्रीकरण करताना दिवसाला 13 तासांची शिफ्ट असते. तसेच दिवसभरात बऱ्याच शिफ्ट असतात आणि कधीकधी नाईट शिफ्टमध्येही काम करावे लागते. अशा परिस्थितीत, अभिनेत्याला दिवसभर सुमारे 15 तास काम करावे लागते. त्याच वेळी, बरेच कलाकार शूटिंगच्या जागेपासून बरेच दूर राहतात, अशा कलाकारांसाठी हे खूप अवघड आहे.’(Know about TV serials shooting)
कोणतेही चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या 90 दिवसानंतर कलाकारांना मानधन मिळते. जसे की, आपण जानेवारीमध्ये शूटिंग करीत असाल तर आपल्याला तीन महिन्यांनंतर म्हणजे मार्च किंवा एप्रिलमध्ये पैसे मिळतील. मग ते काम 1 दिवसांचे असो वा महिनाभराचे, 90 दिवसानंतरच त्याचा मोबदला मिळतो. हे मानधन दिवसांच्या आधारावर दिले जातात. जर आपण एका महिन्यात 10 दिवस काम करत असाल, तर आपल्याला केवळ 10 दिवसांचे पैसे मिळतील.
मालिका सतत सुरु असल्याने, बर्याच वेळा अभिनेत्रीने सतत शूटिंग करावे लागते. याचा त्यांच्या त्वचेवर खूप परिणाम होतो. तसेच शूट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्वचेवर हेवी मेकअप लावला जातो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. तसेच शूटिंगदरम्यान, कलाकारांना विग लावावा लागतो आणि विग लावून काम केल्यामुळे अभिनेत्रींचे 20 टक्के केस गळतात. या समस्या अतिशय वेदनादायी ठरतात.
(Know about TV serials shooting)
जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून ‘पोलखोल’ https://t.co/BJPaaFf6XP #ChalaHawaYeuDya | #VishwasNangarePatil | @vishwasnp |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021