Saif Ali Khan And Kareena Kapoor Khan : बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांची लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध आहे. लोकांना अनेकदा त्यांच्या आवडत्या स्टार्सची प्रेमकथा जाणून घ्यायला आवडते. बॉलिवूडमधील असंच एक लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर.. या दोघांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊया. सैफ-करीनाच्या (saif-kareena) प्रेमाच्या चर्चा खूप गाजल्या. पण या जोडीची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाल्याचे अनेकदा वाचण्यात आले असेल.
टशन या चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढू लागली होती असे मानले जाते. मात्र, आता सैफ-करिनाच्या पहिल्या भेटीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नुकताच प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीने या दोघांच्या भेटीसंदर्भात एक खुलासा केला आहे. सैफ आणि करिनाची प्रेमकहाणी त्याच्या स्टुडिओपासून सुरू झाल्याचे त्याने सांगितले.
फोटोग्राफर डब्बू रतनानीने त्याच्या चाहत्यांसोबत आस्क मी एनीथिंग सेशन ठेवले होते. जिथे एका सोशल मीडिया यूजरने सैफ-करीनाचा जुना फोटो शेअर केला आणि त्यामागील कथा काय आहे, असा सवाल केला. सैफ-करिनाचा हा फोटो डब्बू रत्नानीने 2005 मध्ये क्लिक केला होता. युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना फोटोग्राफर म्हणाला, ते पहिल्यांदाच त्याच्या स्टुडिओमध्ये भेटले होते. येथूनच दोघांमध्ये सर्व काही सुरू झाले. शेअर केलेला फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. ज्यामध्ये सैफ-करीना एकत्र पोज देताना दिसत आहेत.
प्रथम सैफ अली खानचे मन करीनावर जडले होते. त्यानंतर दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि अखेर 2012 मध्ये दोघांनीही एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडले. करीना आणि सैफने 5 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या जोडप्यासोबतच त्यांचे चाहतेही त्यांच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करतात. तैमूरबाबत चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. करिनाची दोन्ही मुलं नेहमीच चर्चेत असतात.