Bigg Boss Contract : कसं असतं Bigg Bossचं कॉन्ट्रॅक्ट ? ते तोडलं तर किती भरावा लागतो दंड ?

| Updated on: Jul 11, 2023 | 11:05 AM

Contract Of Bigg Boss : बिग बॉसतचा कोणताही शो साइन करण्यापूर्वी आर्टिस्ट आणि चॅनेल यांच्यादरम्या एक कॉन्ट्रॅक्ट केले जाते. या रिॲलिटी शो चे कॉन्ट्रॅक्ट बनवताना चनेलतर्फे अनेक कठोर नियमांचा ॲग्रीमेंटमध्ये समावेश केला जातो.

Bigg Boss Contract : कसं असतं Bigg Bossचं कॉन्ट्रॅक्ट ?  ते तोडलं तर किती भरावा लागतो दंड ?
Follow us on

Bigg Boss OTT 2 : सायरस ब्रोचा ‘बिग बॉस ओटीटी 2’ च्या घराबाहेर (Bigg Boss OTT 2) पडला आहे. मधुमेहग्रस्त असलेल्या सायरसची (cyrus brocha) तब्येत बिघडल्यामुळे त्याला शोच्या बाहेर जावे लागले. मात्र संपूर्ण दुनियेला उल्लू बनवणारा हा कॉमेडिअन यापूर्वी वीकेंड का वार मध्ये, सलमान समोर (salman khan) विनंती करताना दिसला होता. तो तीन आठवड्यांचा विचार आला होता, मात्र आता आपल्याला घरात राहणे शक्य नसल्याचे सायरसचं म्हणणं होतं. तो नीट खाऊ पिऊ शकत नाहीये, त्याचा डायबिटीस बॉर्डर लाइनवर पोहोचल्यामुळे शो सोडू इच्छित असल्याचे सायरसने म्हटलं होतं.

सायरसचा हा हट्ट पाहून सलमान खानने त्याला विचारले की, त्याला करार मोडून दंड भरून बाहेर जायचे आहे का ? सलमानचे म्हणणे ऐकून सायरसने थोडा मागे हटला. बिग बॉसचं हे 125 पानाचं कॉन्ट्रॅक्ट (contract) वाचून भल्या-भल्यांना घाम फुटतो, ते तोडण्याचा कोणी विचारही करत नाही. अनेक स्पर्धक कॅमेर्‍यासमोर शो सोडण्याची धमकी देतात, परंतु या करारामुळे, त्यांची धमकी कधीच खरी ठरत नाहीत.

कॉन्ट्रॅक्टनुसार शो च्या बाहेर जाण्याची परवानगी नाही

बिग बॉसच्या करारानुसार, स्पर्धकांना प्रॉडक्शन आणि चॅनलने दिलेल्या वेळेच्या मर्यादेपर्यंत बिग बॉसच्या घरातच राहावे लागेल. स्पर्धक स्वतःच्या इच्छेने घराबाहेर जाऊ शकत नाहीत. मात्र स्पर्धकांनी करार मोडून घराबाहेर जायचं ठरवलं तर त्यांना 2 कोटी रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय कॉन्ट्रॅक्ट तोडण्याचा परिणाम त्यांच्या फीवरही होतो. सायरस पूर्वी बिग बॉसच्या घरातील इतर अनेक स्पर्धकांनीही हे घर सोडण्याचा प्रयत्न केला पण या करारामुळे त्यांना परत यावे लागले होते.

कुशाल टंडन आणि गौहर खान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले होते. तसेच राहुल महाजन, राजा चौधरी, आशुतोष आणि झुल्फी यांनीही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्यामुळे त्या सर्वांना पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात प्रवेश करावा लागला.

कॉन्ट्रॅक्टमधून कधी मिळते सवलत ?

प्रॉडक्शन हाऊससोबत केलेल्या कॉन्ट्रॅक्टमधील वेळ संपल्यानंतर त्या डॉक्युमेंटमध्ये एक्सटेंशनचा उल्लेख नसेल तर स्पर्धक शो सोडू शकतात. एजाज खान, साजिद खान आणि अब्दू रोजिक यांनी त्यांच्या आधीच्या कमिटमेंट्समुळे एक्स्टेंशनपूर्वीच शोचा निरोप घेतला होता.

स्पर्धकांची तब्येत बिघडली, टास्क करताना त्यांना गंभीर दुखापत झाली, तर त्यांना करारातून दिलासा मिळतो. बिग बॉस मराठीमधील तेजस्वी लोणारी आणि बिग बॉस हिंदीमध्ये देवोलिना भट्टाचार्य, अफसाना खान, विकास गुप्ता यांना तब्येतीच्या समस्येमुळे शो सोडावा लागला होता.

 

हिंसाचार केल्यासही शोमधून बाहेर पडावे लागते

तसं पहायला गेलं तर स्पर्धक त्यांच्या मर्जीनुसार शो सोडू शकत नाही, त्यांना तशी परवानगी नसते. पण घरातील इतर सदस्य किंवा सेट किंवा प्रॉपर्टीचे नुकसान केले तर दोषी सदस्याला शो मधून बाहेर काढण्याचा अधिकार बिग बॉसला असतो.

प्रोमोज, इंटरव्यूज, प्रमोशन बद्दलही असतात कॉन्ट्रक्टमध्ये क्लॉज

बिग बॉसच्या स्पर्धकांना चॅनलच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटी, मुलाखती, प्रोमो शूटमध्ये सहभागी होण्यासंदर्भात कॉन्ट्रॅक्टमध्ये एक क्लॉज असतो. चॅनलच्या परवानगीपूर्वी कोणताही स्पर्धक मीडियाशी बोलू शकत नाही, त्यांना मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही.

फिटनेस और हेल्थ चेकअप नंतरच शोमध्ये होतो समावेश

बिग बॉसच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यापूर्वी स्पर्धकांना त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र निर्मात्यांसमोर सादर करावे लागले. मात्र त्यानंतरही बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी सर्व स्पर्धकांची आरोग्य तपासणी केली जाते.