बच्चन कुटुंबातील सर्वात गरीब व्यक्ती कोण ? कोणाची कमाई सर्वाधिक ? सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव ?
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षीदेखील अभिनयाच्या दुनियेत अजूनही ॲक्टिव्ह आहेत. त्यांचा बुलंद आवाज आणि दमदार ॲक्टिंग याचा लोकांवर आजही तितकाच प्रभाव पडतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल बोलायचं झालं बच्चन कुटुंबात फक्त बिग बी हेच नव्हे तर इतरही अनेक सुपरस्टार आहेत. जे दरवर्षी कोट्यवधींची कमाई करतात. पम या कुटुंबात सर्वाधिक श्रीमंत कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? चला जाणून घेऊया.
-
-
अमिताभ बच्चन – ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जाणून घेऊ. त्यांचा पहिला पगार होता फक्त 500 रुपये. पण आज वयाच्या 81 व्या वर्षी बिग बी हे एका चित्रपटासाठी 6 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम आकरतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांचे नेटवर्थ 3,190 कोटी रुपये आहे.
-
-
ऐश्वर्या राय बच्चन – यानंतर या यादीत दुसरं नाव आहे बच्चन कुटुंबातील सून म्हणजेच सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चनचं. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या हिचे नेटवर्थ 776 कोटी रुपये आहे. ऐश्वर्या ही फक्त चितरटचनव्हे तर ब्रँड शूटमधूनही करोडोंची कमाई करते.
-
-
जया बच्चन – या लिस्टमध्ये तिसरं नाव आहे ते अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचं. रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन यांचं नेटवर्थ 640 कोटी रुपये आहे. काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम’ त्यांनी अभिनय केला होता.
-
-
अभिषेक बच्चन – अमिताभ आणि जया बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याच्याबद्दल बोलायचे झाले तर त्याचं नेटवर्थ 212 कोटी रुपये आहे. अभिषेक सध्या चित्रपटांमध्ये एवढा दिसत नसला तरी तो प्रो कबड्डी टीम, फुटबॉल टीम आणि ब्रँड्समधूनही मोठी कमाई करतो.
-
-
श्वेता बच्चन – अमिताभ बच्चन यांची लाडकी मुलगी श्वेता बच्चन बद्दल बोलायचे तर तिचं नेटवर्थ 60 कोटी रुपये आहे.
-
-
नव्या नवेली नंदा – या यादीत अमिताभ यांची नात आणि श्वेता बच्चन हिची मुलगी नव्या नवेली नंदा हिचेही नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, नव्याचं नेटवर्थ 15 कोटी रुपये आहे.
-
-
अगस्त्य नंदा – अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेचा बच्चन हिचा मुलगा अगस्त्य याने नुकतंच ‘द आर्चिज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रिपोर्ट्सनुसार त्याचं नेटवर्थ 2 कोटी रुपये आहे.