मुंबई | 9 जानेवारी 2024 : कॉफी विथ करणचा प्रत्येक सीझन चर्चेत असतो. करण जोहर वेगवेगळ्या सेलिब्रिटींना त्यांच्याशी गप्पा मारतो, काही गॉसिपही करतो. सध्या या शोचा 8 वा सीझन सुरू असून आत्तापर्यंत रणवीर सिंग, दीपिका पडूकोम, आलिया भट्ट, करीना कपूर, विकी कौशल, शर्मिला टागोर, सैप अली खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शोधमध्ये हजेरी लावली. नुकताच या शोचा नव्या भागाचा प्रोमो समोर आला ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर आणि झीनत अमान दिसल्या. त्यांनीही या शोमध्ये येऊन भरपूर गप्पा मारत, धमाल , मजा-मस्ती केली.
विशेष म्हणजे या भागात नीत कपूर या अनेक विषयांवर दिलखुलासपणे बोलल्या. त्यांची आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची जोडी फक्त मोठ्या पडद्यावरच गाजली नाही तर बॉलिवूडमधील एक नामवंत जोडपं अशी त्यांची ख्याती होती. ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलतानाच नीतू यांनी त्यांच्या क्रशबद्दलही सांगितले. मजे-मेजत ही चर्चा सुरू होती, पण तेव्हाच नीतू कपूर यांनी त्यांच्या क्रशचे नाव सांगितल्यावर सर्वांनाच धक्का बसला.
घरातल्याच व्यक्तीच्या प्रेमात पडल्या नीतू सिंग
कॉफी विथ करण शोच्या या भागात करणने नीतू आणि झीनत यांच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. तेव्हा बोलता बोलता करणने नीतू यांना त्यांच्या बॉलिवूड क्रशबद्दल विचारले. तेव्हा एका क्षणाचाही विचार न करता नीतू कपूर यांनी उत्तर दिले ‘शशी कपूर’.. ते ऐकून करण तीनताड उडालाच. तुला तुझ्या ( ऋषी कपूर ) काकांवर क्रश होता ? असं आश्चर्यचकित झालेल्या करणने विचारलं. तेव्हा नीतू म्हणाल्या – हो. ते माझा सीक्रेट क्रश होते, असंही नीतू यांनी सांगितलं.
नीतू कपूर यांच्या या धक्कादायक खुलाशाने सर्वच अवाक झाले. या शोचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर झाला असून नेटकऱ्यांनीही त्यावर विविध कमेंट्स केल्या आहेत.