9 वर्षांनी लहान, मिलिनियर बॉयफ्रेंडसोबत क्रिती सेनन लवकरच लग्नबंधनात? कोण आहे होणारा नवरा?

| Updated on: Dec 17, 2024 | 7:15 PM

प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता क्रिती 2025 मध्ये 9 वर्षांनी लहान, मिलिनियर बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान क्रितीचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे आणि त्याचा काय बिझनेस आहे याबद्दल जाणून घेऊयात

9 वर्षांनी लहान, मिलिनियर बॉयफ्रेंडसोबत क्रिती सेनन लवकरच लग्नबंधनात? कोण आहे होणारा नवरा?
Follow us on

अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या अभिनयाने आणि तिच्या सुंदर दिसण्याने नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. नुकताच आलेला क्रितीचा ‘दो पत्ती’ हा चित्रपट प्रचंड गाजला. तिच्या अभिनयाचे कौतुकही करण्यात आले. पण आता क्रिती एका वेगळ्याचं कारणाने चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिच्या लग्नाच्या. क्रिती लवकरच आता तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा समोर येत आहे.

2025 मध्ये क्रिती सेनन बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात?

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या वैयक्तिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. यंदाचं वर्ष तिच्यासाठी खूपच खास राहिलं. तिचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीच उतरले. आता ती तिच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा प्रकाश झोतात आली आहे.

क्रिती सेनन लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच समोर आलं आहे. याच कारण म्हणजे क्रितीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, या व्हिडिओत ती कबीर बाहियाच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर क्रितीचे काही फोटो,व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दुबईत एका लग्नसोहळ्यातील हे व्हिडिओ आहेत. गुलाबी साडीत क्रिती फारच सुंदर दिसत असून हा कबीर बाहियाच्या नातेवाईकाचा लग्नसोहळा असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळं आता त्यांच्या लग्नाबद्दलही बोललं जात आहे. क्रिती आणि कबीर बाहिया पुढच्या वर्षी लग्न करू शकतात, असंही म्हटलं आल्याने येणारं नवं वर्ष क्रितीसाठी खास असणार आहे असं म्हणायला हरकत नाही.

एवढच नाही तर मात्र गेल्या वर्षी ख्रिसमस व नवीन वर्षांचे स्वागत करताना क्रिती कबीरच्या कुटुंबियांबरोबर दिसून आली होती.क्रिती व कबीर लंडनमध्ये रोमॅंटिक वेळ घालवताना दिसले होते. तसेच ग्रीसमध्ये क्रिती वाढदिवस साजरा करतानादेखील दिसले होते. तर,2025 मध्ये ज्याच्यासोबत क्रितीच्या लग्नाच्या रंगल्या आहेत तो क्रितीचा होणारा नवरा कोण आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.

कोण आहे क्रितीचा बॉयफ्रेंड?

क्रिती सेननचा बॉयफ्रेंड एक बिझनेसमन असून त्याचे नाव कबीर बाहिया आहे. मिळालेल्या माहितीनुसार कबीर हा क्रितीपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. कबीर बाहिया, यूकेमध्ये राहतो. लंडनमधील एका श्रीमंत कुटुंबात कबीर लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील कुलजिंदर बाहिया साउथॉल ट्रॅव्हलचे संस्थापक आहेत.

कबीर हा भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीचाही जवळचा मित्र आहे. तो धोनीचा मेहुणा असल्याचंही म्हटलं जातं. तसेच रिपोर्टनुसार त्याचे एकूण उत्पन्न ४२७ मिलियन असल्याचे देखील म्हटलं जातं.

बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

क्रिती सेनन आणि कबीर बहिया यांचा एकत्र व्हॅकेशनचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याच्या अफवा पसरल्या होत्या. दोघांच्या अफेअरच्य अनेक चर्चा रंगल्या मात्र दोघांनीही यावर मौन बाळगलं होतं.

क्रितीने कबीरच्या वाढदिवशी त्यांच्या रोमँटिक गेटवेमधील फोटोही शेअर केला होता, ज्यामुळे या अफवांना आणखी हवा मिळाली.तसेच आताच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे क्रिती लवकरच लग्नगाठ बांधणार आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.