मुंबई – लता मंगेशकरांची (lata mangeshkar) अनेक गाणी रसिकांच्या तोंडात आजही आपण ती गात असताना पाहता, तसेच त्यांच्या आवाजातील गाणी आजही आपण ऐकत असतो. त्या त्यांच्या आठवणी गाण्याच्या स्वरूपात ठेऊन गेल्या आहेत. त्यामुळे त्यांची आठवण ही नेहमी आपल्याला त्यांचं गाणं ऐकत किंवा म्हणत असताना येईल. नुकतंच त्यांचं मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात (breach candy hospital) निधन झालं. निधन झाल्याची बातमी सबंध देशात वा-यासारखी पसरली त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या सहकलाकरांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली आहे. तसेच अनेक त्यांची गुपिते सध्या उघड होत असताना दिसत आहेत, लता मंगेशकरांचा घसा कधीचं खवखवत नव्हता याबाबतचं बिंदु बोली (bindu boli) यांनी एक रहस्य उघड केलं आहे. त्या गाणं गायच्या आगोदर एक गोळी खात होत्या असं त्याचं म्हणणं आहे.
गोळी का खात होत्या ?
अभिनेत्री बिंदु बोलींचं एक स्वप्न होतं की, लता दीदींनी माझ्यासाठी गाणं गायलं हवं, पण ते त्याचं स्वप्न पुर्ण झालं कारण लता दीदींच्या त्यांच्यावर शुट केलेल्या तब्बल गाणे गायले आहेत. त्यांनी लता दीदींसोबत अनेकदा वेळ घालवला आहे. तसेच ज्यावेळी त्या एखाद्या कामासाठी एकत्र असायच्या त्यावेळी मैत्रीणी सारख्या असायच्या असं बिंदु बोली म्हणतात. बिंदु बोली म्हणतात लता दीदी गाणं गायच्या आगोदर विक्स विपोरब गोळी खायच्या. त्यामुळे गाणे गाताना आवाज एकदम चांगला राहिल आणि आवाजात कुठेही किंचितशी खराबी होऊ नये. एका गाण्याच्या रेकॉडिंगवेळी बिंदु बोली त्याच्यासोबत होत्या. त्यामुळे त्यांना सुध्दा लता दीदींनी एक गोळी दिली असल्याचे बिंदू म्हणतात. ज्यावेळी आम्ही काहीवेळ कामातून विश्रांती घेतली आणि नंतर कामाला सुरूवात केली त्यावेळी सुध्दा त्यांनी मला गोळी दिली.
बिंदुची आणि दीदींची पहिली भेट
लता दीदींनी अनपढ चित्रपटात माझ्यासाठी एक गाण गायलं होतं. त्यानंतर मला त्यांना भेटायचं होतं. नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी माझी पहिली मुलाखात लता दीदींसोबत करून दिली होती. त्यावेळी माझ्या घराच्या बाजूला रेकॉडिंग चालू होतं. त्यावेळी मला एकदा रेकॉडिंग सुरू असलेल्या ठिकाणी प्यारेलाल यांनी यायला सांगितलं. त्यावेळी आमची चांगली ओळख झाली आणि मी माझ्यासाठी तुम्ही अनपढ चित्रपटात गाण गायल्याचं त्यांना सांगितलं होतं.