मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) याचे चरित्र आता मुलांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग बनले आहे. चौथीच्या अभ्यासक्रमातील सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात कपिल शर्मा याची माहिती असलेला एका धडा सामील करण्यात आला आहे. हा धडा वाचून चौथीच्या वर्गातील मुले त्याच्या या संघर्ष कथेतून प्रेरणा घेण्यास सक्षम होतील (Lesson on Kapil Sharma in GK book of 4 th class actor share post).
स्वतः कपिल शर्माने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याच्या एका फॅन क्लबने शेअर केली आहे, त्यात कपिलच्या नावाचा धडा त्या पुस्तकात दाखवला आहे. कपिलने ती पुन्हा रीपोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसू शकते की या धड्यात कपिलविषयी सविस्तर माहिती लिहिली आहे. फोटोमध्ये दर्शवलेल्या चित्रात कपिल शर्माचा फोटो आहे. दुसर्या फोटोमध्ये तो आपल्या टीमसोबत उभा आहे, यात त्याच्या शोचा जुना पार्टनर नवज्योतसिंग सिद्धूही दिसला आहे. त्याचा आणखी एक फोटो आहे जो ‘किस-किस को प्यार करूं’ या चित्रपटातील आहे. ‘कॉमेडी किंग कपिल शर्मा’ असे या धड्याचे शीर्षक आहे.
कपिल शर्मा याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर कमावलेली ही जागा भारताच्या मोठ्या विनोदी कलाकारांच्या यादीत त्याला नेऊन ठेवणारी आहे. कपिल एका दशकापेक्षा जास्त काळ टीव्हीचा ‘कॉमेडी किंग’ म्हणून ओळखला जातो आहे. स्टँड अप कॉमेडीपासून सुरू झालेली त्याची कारकीर्द आज ‘किंग ऑफ कॉमेडी’च्या पदावर पोहोचली आहे. अभिनय क्षेत्रातही कपिलने आपले नशीब आजमावले. अभिनेता म्हणून देखील तो लोकांना आवडला (Lesson on Kapil Sharma in GK book of 4 th class actor share post).
कपिल शर्माचा सोनी टीव्हीवरील कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी बंद झाला होता. यानंतर कपिलने जाहीर केले की, तो लवकरच नेटफ्लिक्सवर कॉमेडी शो घेऊन येणार आहे. ज्याचे स्वरूप त्याच्या टीव्हीच्या शोपेक्षा पूर्णपणे भिन्न असणार आहे.
कपिलने आपल्या टीव्ही शोमध्ये सांगितले होते की, त्याने या क्षेत्रात बराच काळ संघर्ष केला आहे. पंजाबहून मुंबईला येतानाही त्याला अनेक संकटे झेलावी लागली होती. पण त्याने हार मानली नाही, याचा परिणाम आज संपूर्ण जगासमोर आहे. कपिलने जगातील जवळपास सर्व मोठ्या शहरांमध्ये आपले कार्यक्रम केले आहेत, त्यासाठी तो आता भरमसाठ फी देखील आकारतो. त्याने आपला कार्यक्रम अशा स्तरावर नेला जिथे कोणताही मोठा सुपरस्टार आपल्या फिल्मचा प्रचार केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही.
(Lesson on Kapil Sharma in GK book of 4 th class actor share post)
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न, सासरच्यांवर केले गंभीर आरोप!#ChitraKotoor | #BiggBoss | #BiggBossKannada7https://t.co/CJdLKo8Adu
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 9, 2021