मुंबई : सध्या प्रेक्षक कुठला राग कुठे व्यक्त करतील याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. प्रेक्षक आपला राग डिजिटल माध्यमांतून व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमधील ‘घराणेशाही’ वादानंतर अनेक येऊ घातलेल्या चित्रपटांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या रागाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता निर्मात्यांनीच या ‘बॉयकॉट’ प्रकरणाचा धसका घेतला आहे. अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi Bomb) चित्रपटाच्या ट्रेलरवर लाईक-डिसलाईक पर्याय बंद करण्यात आले आहेत. (Like Dislike Option Hide From Akshay Kumar Laxmmi Bomb trailer)
‘लक्ष्मी बॉम्ब’च्या धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लाईक-डिसलाईकचे बटण न दिसल्याने प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवाय हे बटण बंद असल्याने यावरच्या प्रतिक्रिया देखील पाहता येत नाहीत. त्यामुळे अक्षय कुमारही आता ‘बॉयकॉट’ला घाबरला का, असा प्रश्न चाहत्या वर्गातून उपस्थित केला जातो आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये ‘ड्रग्ज कनेक्शन’ प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक बड्या कलाकारांची नावेदेखील घेतली गेली आहेत. तर, अनेकांनी यावर आपली मतेदेखील नोंदवली होती. या सगळ्यात अक्षय कुमार मात्र शांत होता. त्याच्या आगमी दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांनी या प्रकरणावर भाष्य करणे सोयीस्कर समजले. त्याचमुळे नाराज प्रेक्षकांनी त्याच्या चित्रपटांविरोधात ‘बॉयकॉट’चा नारा सुरू केला होता. ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित होणार हे कळल्यावर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लक्ष्मी बॉम्ब’ ट्रेंडमध्ये आले होते. त्यामुळे आज ट्रेलर प्रदर्शित करताना व्हिडिओवरून लाईक-डिसलाईकचे बटणच हटवले गेले. (Like Dislike Option Hide From Akshay Kumar Laxmmi Bomb trailer)
Bahot dino se mann mein kuch baat thi lekin samajh nahi aa raha tha kya kahoon, kisse kahoon. Aaj socha aap logon se share kar loon, so here goes… #DirectDilSe ?? pic.twitter.com/nelm9UFLof
— Akshay Kumar (@akshaykumar) October 3, 2020
नुकताच प्रदर्शित झालेला ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi bomb) चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमारने (Akshay kumar) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. ‘जिथे कुठे असला तिथेच थांबा, आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा. कारण आता लक्ष्मी बरसणार आहे,’ असे कॅप्शन देत त्याने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चा धमाका होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 9 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असला तरी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार निर्माते करत आहेत. राघव लॉरेन्स यांनी या धमाकेदार हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
(Like Dislike Option Hide From Akshay Kumar Laxmmi Bomb trailer)
संबंधित बातम्या :
Laxmmi Bomb Trailer | ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका, अक्षय कुमारचा नवा ‘क्वीन’ अंदाज!