मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर अनेकजण नवीन वस्तू खरेदी करतात. अशीच एक नवी वस्तू खरेदी केली आहे एका बॉलिवूड अभिनेत्रीने. ती अभिनेत्री म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित. अभिनेत्री माधुरी दीक्षितने मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर माधुरीने लक्झरी कार खरेदी केली आहे. सध्या या कारची प्रचंड चर्चा होतानाही दिसत आहे.
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी खरेदी केली आलिशान कार
रिपोर्टनुसार माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी फेरारी 296 GTS ही महागडी कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत 6 कोटींहून अधिक आहे. 13 जानेवारीला मुंबईत हे कपल लाल रंगाच्या फेरारीमध्ये दिसले. त्यांनी कार खरेदी केल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये डॅा. नेने आणि माधुरी यांची स्वीट कपलची जोडी दिसत आहे. व्हिडीओमध्ये माधुरीने शिमरी असा गाऊन घातल्याचं दिसत आहे, तर डॅा. नेने यांनी काळ्या रंगाचा सूट घातला आहे.
माधुरीकडे स्पोर्ट्स कारपासून ते मर्सिडीजपर्यंत सर्व कार
माधुरीकडे Mercedes Maybach S560 ही कार देखील आहे, ज्याची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये इतकी आहे. माधुरीकडे अगोदरच मर्सिडीज मेबैक एस 560सुद्धा आहे ज्याची किंमत 2.5 कोटी रुपये आहे. याशिवाय मर्सिडीज एस क्लास 450, स्कोडा ऑक्टेविया वीआरएस, इनोवा क्रिस्टा, रेंज रोवर वोग या लक्झरी कारही देखील आहे. तसंच काही स्पोर्ट्स कारही आहेत.
डॉक्टर नेने अन् माधुरी दोघेही कारप्रेमी
या आलिशान कारच्या कलेक्शनमुळे ही जोडी कारप्रेमी आहे असं म्हटलं जातं. पण माधुरीपेक्षाही डॉक्टर नेने हे कारचे शॉकिन असल्याचं म्हटलं जातं.तसेच ही पती-पत्नीची ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध असतेच. रिल्सच्या माध्यमातून किंवा डॉक्टर नेने हे जेव्हा एखादा पदार्थ बनवतात तेव्हा देखील या दोघाचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात.
90 च्या दशकात माधुरीने तिच्या अदाकारीने या धक धक गर्लने सर्वांनाच घायाळ केलं. लग्नानंतर माधुरी अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक होती. मात्र आता ती कुटुंबासोबत मुंबईतच असून पुन्हा सिनेसृष्टीत सक्रीय झाली आहे. आज 57 वर्षीय माधुरीला 21 वर्षीय अरीन आणि 19 वर्षीय रायन ही दोन मुलंही आहेत.