Ashadhi Ekadashi 2022: विठ्ठल, विठ्ठल, जय हरी! महानायक अमिताभ बच्चन विठू माऊलींच्या भक्तीत दंग; सायनच्या मंदिरात केली महापुजा

| Updated on: Jul 10, 2022 | 9:57 PM

मुंबईच्या सायन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी विठूरायाचे दर्शन घेतले. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विठ्ठलाची महापुजा संपन्न झाली. अमिताभ बच्चन यांनी मनोभावे विठू माऊलींची सेवा केली. स्वत: अमिताभ बच्चन यांनी या पूजेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

Ashadhi Ekadashi 2022: विठ्ठल, विठ्ठल, जय हरी! महानायक अमिताभ बच्चन विठू माऊलींच्या भक्तीत दंग; सायनच्या मंदिरात केली महापुजा
Follow us on

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी (Pandharpur wari 2022) विठू माऊलीच्या दर्शनासाठी (vitthal darshan) पंढरपुरात दाखल झाले. आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर नागरीत वैष्णवांचा जनसागर पाहायला मिळला. अशातच महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan ) हे देखील विठू रायाच्या भक्तीत लीन झाल्याचे पहायला मिळाले. आषाढी एकादशी निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी विठ्ठलाची मनोभावे पूजा केली.

मुंबईच्या सायन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी विठूरायाचे दर्शन घेतले. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विठ्ठलाची महापुजा संपन्न झाली. अमिताभ बच्चन यांनी मनोभावे विठू माऊलींची सेवा केली. स्वत: अमिताभ बच्चन यांनी या पूजेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जय हरी || जय विठ्ठल विठ्ठल जय हरी || आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा… असे कॅप्शन अमिताभ बच्चन यांनी दिले आहे.

पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेस सुंदर पोशाश परिधान करुन दररोज नित्य पूजा तसेच काकड आरती केली जाते. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. अमिताभ बच्चन यांनी मंदिर समितीच्या वतीने ट्विटरवर शेअर केलेले फोटो त्यांच्या ट्विटर हॅंडलवरुन पोस्ट करत प्रार्थना केली होती.

अमिताभ बच्चन यांनी करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असताना देवाकडे प्रार्थना केली होती. करोनाशी युद्ध सुरू असताना, बिग बींनी त्यांच्या पोस्टद्वारे डॉक्टरांचे आभार मानले होते. रुग्णालयात दाखल असताना अमिताभ बच्चन यांनी भगवान विठ्ठल आणि देवी रखुमाई यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून प्रार्थना केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठूरायाची महापूजा केली. बीड जिल्ह्याच्या गैरवाई तालूक्यातील रुई येथील नवले दांपत्याला यंदा मानाचे वारकरी म्हणून महापूजेचा मान मिळाला. मुरलीधर नवले आणि जिजाबाई नवले हे शेतकरी दांपत्य संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी वारीत आले आहेत.