गौरव मोरेने ‘हास्यजत्रे’ला केला रामराम ? आता पुढे काय ?

| Updated on: Apr 13, 2024 | 11:20 AM

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोचे असंख्य चाहते आहेत. गौरव मोरे याची प्रेक्षकांमध्ये खूपच क्रेझ आहे. त्याचे विनोदाचे टायमिंग, पंचेस यामुळे त्याचं स्किट नेहमीच बहारदार होतं आणि प्रेक्षकांनाही खूप आवडतं. मात्र आता हाच गौरव मोरे आता "हास्य जत्रा"मध्ये दिसणार नाहीये.

गौरव मोरेने हास्यजत्रेला केला रामराम ? आता पुढे काय ?
Follow us on

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोचे असंख्य चाहते आहेत. छोट्या पडद्यावरील हा शो खूप लोकप्रिय देखील आहे. समीर चौगुले, वनिता खरात, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे असे एक से एक कलाकार या शोमध्ये धमाल करत असतात. प्रत्येकाची एक वेगळी अदा असून ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. मात्र तरीही त्यांच्यातील गौरव मोरे याची प्रेक्षकांमध्ये खूपच क्रेझ आहे. त्याचे विनोदाचे टायमिंग, पंचेस यामुळे त्याचं स्किट नेहमीच बहारदार होतं आणि प्रेक्षकांनाही खूप आवडतं.

मात्र आता हाच गौरव मोरे आता “हास्य जत्रा”मध्ये दिसणार नाहीये. “हास्य जत्रा” ऐवजी तो आता एका हिंदी शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणार असल्याचे वृत्त आहे.

या शोमध्ये होणार एंट्री 

गौरव मोरे याची नुकतीच ‘मॅडनेस मचाएंगे-इंडिया को हंसाएंगे’ या शोमध्ये एंट्री झाली असून हा कॉमेडी शो सोनी एंटरटेनमेंट चॅनेलवर दिसणार आहे. सोनी टीव्हीने या शोचा एक प्रोमो शेअर केला असून त्यामध्ये गौरव मोरेही झळकला आहे.  त्याच्या शिवाय या शोमध्ये हेमांगी कवी, कुशल बद्रिके तसेच सृष्टी रोजे, बलराज सयाल, सुगंधा मिश्रा हे सर्व कलाकारही फुल्ल धमाल करताना दिसणार आहेत. करिअरच्या उंचीवर असतानाच गौरव मोरेने हा महत्वाचा निर्णय घेत गरूड झेप घेतली आहे.

 

सोनी टीव्ही सारख्या नामवंत चॅनेलवरील कॉमेडी शोमध्ये त्याची एंट्री होत असल्याने गौरव मोरेचे असंख्य चाहतेदेखील खूप खुश आहेत. त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शोचा प्रोमो देखील शेअर केला आहे. त्यामध्ये तो एक स्किट सादर करत असून त्यासोबत हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके हे दोघेही दिसत आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मराठी पाऊल पडते पुढे असे म्हणत चाहत्यांनी गौरवला या नव्या प्रवासासाठी असंख्य शुभेच्छाही दिल्या आहेत.