आमिर खानमुळे महेश भट्टनी सोडला ‘गुलाम’? 26 वर्षांनी मोठा खुलासा

| Updated on: Jul 27, 2024 | 10:45 AM

1998 साली प्रदर्शित झालेल्या गुलाम चिकत्रपटाने बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घातला होता. पण या चित्रपटातील प्रमुख कलाकारामुळे महेश भट्ट यांना चित्रपट सोडावा लागला होता, हे तुम्हाला माहीत आहे का ?

आमिर खानमुळे महेश भट्टनी सोडला गुलाम? 26 वर्षांनी मोठा खुलासा
Follow us on

महेश भट्ट हे चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अर्थ, सारांश, नाम, कब्जा, सडक, दिल है के मानता नही, जख्म,आशिकी, हम हैं राही प्यार के अशा अनेक चित्रपटांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या खात्यात आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपट जमा झाला असता पण मुख्य भूमिका साकारणाऱ्या एका स्टारमुळे त्यांनी दिग्दर्शन मध्यातच सोडलं.
हो, हे खरं आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यामुळे महेश भट्ट यांना चित्रपटाचे दिग्दर्शन सोडण्यास भाग पडले. त्यानंतर त्यांनी चित्रपटाची कमान विक्रम भट्ट यांच्या हातात द्यावी लागली. तो चित्रपट कोणता होता आणि तो स्टार कोण, याबद्दल जाणून घेऊया.

गुलामचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी का सोडलं ?

तो ब्लॉकबस्टर चित्रपट होता गुलाम आणि तो स्टार अभिनेता दुसरा कोणी नसून मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांनी खुलासा केला की, मुळात तेच गुलामचे दिग्दर्शन करणार होते, पण आमिरमुळे त्यांनी चित्रपट सोडला. गुलाम या चित्रपटासाठी तुम्ही जीवन समर्पित करू शकता का , असा सवाल आमिरने महेश भट्ट याना विचारला होता. मात्र तो प्रश्न ऐकल्यावरच महेश भट्ट यांनी तातडीने निर्णय घेतला. विक्रम भट्ट हाच त्याची सर्व एनर्जी, सर्व शक्ती या चित्रपटासाठी पणाला लावू शकतो, हे त्यांच्या लक्षात आलं.

महेश भट्ट म्हणाले, “मी यापासून (चित्रपट) दूर जाण्याचा निर्णय घेतला. मी माझं संपूर्ण आयुष्य पमाला लावून शकेन इतका हा चित्रपट माझ्यासाठी महत्वाचा आहे असं मला वाटत नाही. उलट मी असं म्हटल तर ते खोटं ठरेल, असं मी आमिरला सांगितलं.’ ‘त्यामुळे मी यापासून (चित्रपटापासून ) दूर जाण्याचा निर्णय घेतला. मी आमिरला सांगितले, मला असे वाटले नाही की चित्रपटांचा माझ्यासाठी इतका अर्थ आहे की मी माझे संपूर्ण आयुष्य त्यांना समर्पित करेन. माझ्यासाठी याचा अर्थ इतका नाही. आणि ते. मी असे म्हटले तर ते खोटे ठरेल.’

विक्रम भट्टकडे सोपवली कमान

त्याच्या या उत्तराने आमिर खान आश्चर्यचकित झाला, असेही महेश भट्ट यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “मी त्याला सांगितलं की, यासाठी जर कोणी आपला जीवन समर्पित करू शकेल, तर तो विक्रम भट्ट आहे. मी जेव्हा गुलाम चित्रपट पाहिला तेव्हा मी मंचावर घोषणा केली की त्यानेच (विक्रम) चित्रपट बनवला आहे. माझ्यापेक्षा सरस चित्रपट त्याने तयार केला, हा एका गुरूचा विजय आहे, असे त्यांनी नमूद केले.

गुलाम चित्रपट 19 जून 1998 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि खूप बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यामध्ये आमिर खानसोबत राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका होती.