मुंबईः अभिनेत्री महिमा चौधरीने (Actress Mahima chaudhry) आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचे (Brest Cancer) निदान झाल्यानंतर नुकतेच कॅन्सरशी आपण कसा लढा दिला याबद्दल सांगितले. महिमा चौधरीने एका मुलाखतीत तिने स्पष्ट असे सांगितले होते की, कर्करोगाशी लढण्याच्या या तिच्या प्रवासात संजय दत्तची (Sanjay Dutt) खरी प्रेरणा आहे. महिमाने सोशल मीडियावर ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानाची माहिती दिली होती मात्र, त्यानंतर आता अभिनेत्री या धोकादायक परिस्थितीतून बाहेर आली आहे.
महिमा चौधरी द सिग्नेचर चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करते आहे. येणाऱ्या चित्रपटातून कमबॅक करणाऱ्या महिमाने सांगितले की, या तिच्या आजारपणाच्या काळात तिला खरी प्रेरणा मिळाली ती, अभिनेता संजय दत्तकडून. ऑगस्ट 2020 मध्ये संजय दत्त यांना फुफ्फुसाच्या कॅन्सर झाल्याचे निदान होऊन चौथ्या स्टेजपर्यंत पोहचला होता. तरीही संजय दत्तने पुन्हा KGF 2 चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले होते.
महिमाने संजय दत्तच्या कामाची आठवण करुन देत सांगितले की, संजय दत्तच्या आयुष्याप्रमाणेच माझ्या आयुष्याकडेही एक प्रेरणा म्हणून पाहिले गेले तर मला निश्चितच आनंद होईल. यावेळी महिमाने हेही सांगितले की, मीही इतर लोकांकडून प्रेरणा घेतली आहे. जेव्हा संजय दत्त कर्करोगाशी झुंज देत होता, तेव्हाही तो शूटिंगमध्येच होता. त्याच त्याच्या सेट आणि त्याच्या कथेने मला खरी प्रेरणा मिळाली आहे.
महिमा चौधरीने संजय दत्तची आठवण सांगताना तिने महेश मांजरेकरांची आठवणही सांगितली. ती म्हणाली की, मी, संजय दत्त आणि महेश मांजरेकर, आम्ही सर्वांनी ‘कुरुक्षेत्र’ चित्रपटात एकत्र काम केले होते. आम्हा तिघांनाही कॅन्सरशी जवळजवळ एकाच वेळी लढावे लागले आहे. यावेळी तिच्या काळातील आगेमागे असणाऱ्या सोनाली बेंद्रे, मनीषा कोईराला आणि ताहिरा कश्यप यांच्या कॅन्सरच्या कथांनी तिला जगण्याची प्रेरणा दिली आहे.
मराठी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या द सिग्नेचर या चित्रपटातून महिमा पुनरागमन करत आहे. महिमा सध्या लखनऊमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर यांचीही प्रमुख भूमिका आहे. अनुपम यांच्या कारकिर्दीतील हा ५२५ वा चित्रपट असणार आहे. महिमाने अलीकडेच चित्रपटाच्या सेटवर विग घातलेला एक फोटो शेअर केला आहे. महिमा चौधरीने 2016 मध्ये ‘डार्क चॉकलेट’ हा शेवटचा बंगाली चित्रपट केला होता.