PHOTO | ब्रह्मेंच्या घरात वाजणार चौघडे-सनई, सोनपावलांनी प्रवेश करणार सुनबाई ‘सई’!

| Updated on: Dec 24, 2020 | 6:51 PM

प्रेमाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात आणि त्या कितीही तोडायच्या म्हटल्या तरी तुटत नाहीत, असं जे म्हटलं जातं, ते प्रत्यक्षात होताना आता पहायला मिळणार आहे.

1 / 5
‘माझा होशील ना’ या मालिकेमधल्या नव्या रंजक घडामोडींनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलेलं आहे. आदित्यला दापोलीमध्ये गाठून सईने तिचं प्रेम जाहिर केलंय, पण आदित्यने मात्र त्यागभावनेने सईला नकार दिलाय.

2 / 5
असं घडत असतानाच मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडिया आणि टिव्हीवर झळकू लागलाय, ज्याने उत्कंठा अधिकच ताणली गेलीये आणि प्रेक्षकांमधे चर्चा रंगू लागलीये.

3 / 5
हा प्रोमो सई आदित्यच्या लग्नानंतरचा असून, यात सई मामांच्या हट्टापायी उखाणा घेताना दिसतेय. मुंडावळ्या,हार आणि पारंपारिक वेष परिधान केलेले सई आदित्य सायकलवरुन निघालेले दिसत आहेत.

4 / 5
आदित्य आणि सईचं लग्न होणार हे 100% खरं असून त्या दिशेने प्रवासही सुरु झालाय. पण एकमेकांपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असलेले सई आणि आदित्य खऱ्या प्रेमाने आणि नशीबाने कसे एकमेकांकडेच ओढले जाणार आहेत, हे आता पहायला मिळणार आहे.

5 / 5
प्रेमाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात आणि त्या कितीही तोडायच्या म्हटल्या तरी तुटत नाहीत, असं जे म्हटलं जातं, ते प्रत्यक्षात होताना आता पहायला मिळणार आहे. सई आणि आदित्यचा एकमेकांपासून विलग होण्यापासून ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्यापर्यंतचा भन्नाट प्रवास आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.