मुंबई : ‘माझा होशील ना’ (Majha Hoshil Na) या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेत (Serial) सध्या सई आणि आदित्यच्या जीवनात दररोज काही ना काही घडामोडी घडत आहेत. दोघांमध्ये फुलणारे प्रेम आणि सईचं नवं नातं मालिकेला एका रंजक वळणावर घेऊन आलं आहे. सध्या मालिकेत सई आणि सुयशच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे. मात्र, या सोहळ्यात आता तिला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे (Majha Hoshil Na Serial latest update sai and suyash engagement).
आपलं आदित्यवर प्रेम आहे, याची जाणीव झाल्यानंतर सईने त्याला ही गोष्ट सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, प्रेम असूनही वाचनात अडकलेल्या आदित्यने सईला स्पष्ट नकार दिला होता. यावर चिडलेल्या सईने अखेर सुयशशी लग्नाचा निर्णय घेतला आहे.
दादा मामाच्या आजारपणात त्याला मेघनाशी लग्न करण्याचं दिलेलं वाचन पाळण्यासाठी आदित्य थेट दापोलीत जाऊन पोहचला होता. दापोलीत जाऊन त्याने मेघना आणि तिच्या बाबांची भेट घेऊन लग्नाची पुढची बोलणी देखील केली. आदित्य दापोलीत जात असल्याचे ऐकून सईसुद्धा त्याच्या मागे दापोलीत पोहोचली होती. यावेळी तिने आदित्यवरील प्रेमाची कबुली देखील दिली. मात्र, मामाच्या वचनात अडकलेल्या आदित्यने कोणतेही कारण न देता तिचा प्रस्ताव धुडकावून मेघनाशी लग्नाचा निर्णय घेतला आहे (Majha Hoshil Na Serial latest update sai and suyash engagement).
आदित्यच्या नकाराने चिडलेली सई मुंबईला परतली. त्यानंतर तिने आदित्यला वाईट वाटावे म्हणून सुयशला होकार देण्याचा निर्णय घेतला होता. सुयशशी लग्नाला तयार झाल्याचे कळल्यावर तरी आदित्य प्रेमाची कबुली देईल, असे वाटल्याने सईने नाटक सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आदित्यवर काहीच फरक पडत नसल्याचे दिसताच चिडलेल्या सईने अखेर आदित्यचा बदल घेण्याचे ठरवून, सुयशशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सईच्या साखरपुड्याला येणार का आदित्य? #ZeeMarathi #majhahoshilna
आपल्या आवडत्या शोजचे पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी https://t.co/XPRixUyYGb या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा Zee5 ॲप. pic.twitter.com/MnOz3oQoYW
— Zee Marathi (@zeemarathi) January 12, 2021
साखरपुड्याच्या एक दिवस आधीच सईला आदित्यचे आपल्यावर प्रेम असल्याचे त्याच्या मामाकडून कळते. मात्र, दादामामाच्या वाचनात अडकलेला आदित्य आपला निर्णय बदलणार नाही हे सईला कळले आहे. त्यामुळे त्याला माफ करून पुढे जाण्याचा निर्णय सीने घेतला आहे.
मात्र, ऐन साखरपुड्यात सईला आणखी काही धक्के बसणार आहेत. सई-आदित्यचे एकमेकांवर प्रेम आहे, हे कळल्यावर सुयश मुद्दाम आदित्यला त्याच्या साखरपुड्यात मजूरासारखा राबवणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे स्वतःच्याच साखरपुड्यात दारूच्या नशेत तर्र सुयश पुन्हा नवा हंगामा करणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये या सोहळ्याची काही झलक पाहायला मिळते आहे. मात्र, या आधीच्या प्रोमोमध्ये सई आणि आदित्यचे लग्न दाखवल्याने पुढे काय होणार, याकडे सगळ्याच प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सई आदित्यला कायमचं वेगळं करण्यात यशस्वी होईल का सुयश? #ZeeMarathi #majhahoshilna
आपल्या आवडत्या शोजचे पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी https://t.co/XPRixUhnhB या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा Zee5 ॲप. pic.twitter.com/74Ho5qA3rb
— Zee Marathi (@zeemarathi) January 11, 2021
(Majha Hoshil Na Serial latest update sai and suyash engagement)