मुंबई : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद (Mumbai Terrorist Attack) झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या जीवनावर ‘मेजर’ चित्रपटाचं टीझर (Major Teaser) येत्या 12 एप्रिलला लाँच करण्यात येणार आहे. या चित्रपटात मेजर अदीप शेष मेजर संदीपची भूमिका साकारणार आहेत. टीझर लॉन्चिंग इव्हेंटबद्दल बोलायचं झालं तर प्रथमच बॉलिवूड, टॉलीवूड आणि मॉलिवूडमधील दिग्गज कलाकार एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत.
हिंदी, तेलगू आणि मल्याळम भाषेत टीझर शेअर होणार
बॉलिवूडचे भाईजान सलमान खान, टॉलीवूड सुपरस्टार महेश बाबू आणि मल्याळम ज्येष्ठ पृथ्वीराज सुकुमारन हे या चित्रपटात झळकणार आहेत. हिंदी, तेलगू आणि मल्याळम भाषेत तुमचे लाडके कलाकार सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा टीझर शेअर करतील.
कोरोनामुळे लाँचिंग कार्यक्रम रद्द
‘मेजर’ चित्रपटाचा टीझर 12 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच सांगितलं होतं. त्याचबरोबर, आदित्य शेष देखील गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सोशल मीडिया हँडलवरून मेजर चित्रपटाविषयी अनेक पोस्ट शेअर करत आहेत. आजही त्यांनी टीझर लाँचिंगबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाचा टीझर 26 मार्च रोजी मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमांतर्गत लाँच होणार होता, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागलाय.
प्रेक्षकांना चित्रपटाविषयी उत्सुकता
प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, कारण ही शूर सैनिकाची अमर कथा आहे ज्यानं देशासाठी दहशतवाद्यांशी लढताना आपला जीव गमावला. त्यांनी भारताच्या संरक्षणासाठी लढा दिला. ‘मेजर’ चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले जाईल. आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते प्रमुख बनण्यापर्यंत या शूर सैनिकाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून 2 जुलै 2021 रोजी संपूर्ण भारताला बघायला मिळणार.
संदीप उन्नीकृष्णन यांच्या भावना
एका मुलाखतीत आदिवी त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणाला, संदीप उन्नीकृष्णन यांच्या कथेनं मी खूप प्रभावित झालो. मला आठवतंय की मी त्यांचा एक फोटो पाहिला होता जो सर्व चॅनेल्सवर दाखवला गेला होता. त्यांचा चेहरा पाहून ते मला माझ्या कुटुंबाचा भाग असल्यासारखे वाटले. नंतर मला कळलं की हे मेजर संदीप उन्नीकृष्णन आहेत ज्यांनी देशासाठी प्राण दिलेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक शशी किरण यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा ही घटना घडली तेव्हा आम्ही कोणीही तिथे नव्हतो. त्यावेळी बातमीत जे काही दर्शवलं गेलं ते आपल्या सर्वांना माहित आहे. आपण आपल्या कल्पनेतून जे काही दाखवितो त्यात वास्तवाचे रंग भरणे हे मोठं आव्हान आहे.
संबंधित बातम्या