मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूड जोडी नेहमी काहीना काही कारणांनी चर्चेत असते. मग ते त्यांचे अफेअर असो किंवा त्यांचं ब्रेकअप किंवा त्याचे सोशल मीडियावरील पोस्ट असो. दरम्यान त्यांचा ब्रेकअप झाल्यापासून तर सर्वांचच या जोडीकडे लक्ष असतं.
अर्जून कपूर अन् मलायकाचं ब्रेकअपवर भाष्य
तसेच कोणत्याही मुलाखतीत त्यांना एकमेकांबद्दलच प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत अर्जून कपूरनेच फक्त त्यांच्या ब्रेकअपवर भाष्य केलं असून एका कार्यक्रमात अर्जुन कपूर याने आपण सिंगल असल्याचे म्हटले होतं. मलायकाने मात्र यावर काहीही उत्तर दिलेलं नाही.
मलायका हिने देखील रिलेशनशिपबद्दलचे एक स्टेट्स सोशल मीडियावर शेअर केले होते पण त्यावरून तिला नक्की काय म्हणायचं होतं त्याचा उलगडा मात्र झाला नव्हता.
ब्रेकअपनंतर पुन्हा दोघे एकत्र दिसले
ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा हे दोघे एकत्र दिसले नाहीत. मात्र, काही महिन्यांपूर्वी मलायका अरोराच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी मलायकासोबत अर्जुन दिसला.
त्यानंतर मात्र पुन्हा कधी त्यांना एकत्र पाहण्यात आलं नाही. पण ब्रेकअपच्या बऱ्याच महिन्यानंतर आता मलायका आणि अर्जुन यांना पुन्हा एकदा एका कार्यक्रमात एकत्र पाहिलं गेलं अन् चर्चांना पुन्हा उधान आलं.
मलायका अरोरा दिसली जबरदस्त लूकमध्ये तर, अर्जुन कपूरने टी शर्ट घातला होता
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या जोडीला एका फॅशन शोमध्ये स्पॉट करण्यात आलं. फॅशन शोमध्ये करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी रॅंप वॉक केला. यावेळी मलायका अरोरा ही जबरदस्त लूकमध्ये दिसत होती. अर्जुन कपूरने टी शर्ट घातला होता.
मात्र, एकाच कार्यक्रमात मलायका आणि अर्जुन एकत्र असूनही एकमेकांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांनी दोघांमध्ये असलेलं अंतर पाळल्याचं दिसून आलं.
ब्रेकअपचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट
दरम्यान मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप नेमके कशामुळे झाले याचं निश्चित कारण अजूनही समोर आलेलं नाही. पण त्यांनी जे काही स्टेटस पोस्ट केले होते किंवा मुलाखतींमध्ये जे काही त्यांच्या नात्याबद्दल बोलले त्यावरून तरी या दोघांनाही त्यांची स्पेस महत्त्वाची होती असचं काहीसं दिसून आलं होतं.
अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका ही जास्त वेळ विदेशात घालवताना दिसली. ती सतत विदेशातील फोटो शेअर करताना दिसली. अर्जुननंतर मलायका नेमकी कोणाला डेट करत आहे, याची आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. मलायका आणि अर्जुन फॅशन शोमध्ये एकत्र दिसल्यानंतर चाहत्यांनी देखील अनेक कमेंटस् केल्या आहेत.