मुंबई : पुण्यातील (Pune) एका फॅशन इव्हेंटमधून मुंबईला परतत असताना 2 एप्रिल रोजी मलायका अरोरा (malaika arora) हिच्या कारचा अपघात झाला. या अपघातात तिला किरकोळ दुखापत झाली. रुग्णालयातून तिला घरी सोडण्यात आले. तेव्हापासून ती घरीच आराम करत आहे. पण आता बऱ्याच दिवसांनी तीने तीच्या सोशल मीडियावर (social Media) एक लांबलचक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तीने डॉक्टर, कुटुंब आणि इतरांचे त्यांच्या काळजीबद्दल आभार मानले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या. तिने तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट देखील दिले आहेत.
मलायका अरोरा नुकतीच मुंबईत दुर्दैवी कार अपघातानंतर चर्चेत आली. इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर करत मलायकाने लिहिले की, “गेले काही दिवस आणि ज्या घटना घडल्या आहेत त्या खूपच धक्कादायक होत्या. भूतकाळात विचार करणे हे एखाद्या चित्रपटातील भयानक दृश्यासारखे वाटते आणि प्रत्यक्षात घडलेले काही नाही असंच वाटत आहे. या अपघातनंतर मला असे वाटले की एका शक्ती माझे रक्षण करत आहे. मला रुग्णालयात पोहोचण्यास मदत करणारे लोक असोत, माझे कुटुंब असो जे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि रुग्णालयातील कर्मचारी असो. माझ्या डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीत शक्य तितक्या काळजी घेण्याचा प्रयत्न केला. आता मला बरे वाटत आहे. आणि शेवटी माझे मित्र, कुटुंब, माझी टीम आणि माझ्या इंस्टा फॅमकडून मिळालेले प्रेमाबद्दल मी आभारी आहे.
मलायका अरोरा हिच्या कारला मुंबईजवळील पनवेलमध्ये अपघात झाल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मलायका किरकोळ दुखापत झाली आहे. मलायका अरोराच्या कारच्या ड्रायव्हरचा तोल सुटला आणि एक्सप्रेस वेवर इतर तीन कारमध्ये धडक झाली. मलायकाच्या डोळ्याजवळ किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संबंधीत बातम्या
Soman Kapoor : सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या घरात चोरी, 1.4 कोटींची रक्कम, दागिने लंपास