मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्री बर्याचदा तिचे फिटनेस व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. मलायका अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करते. मलायका अरोराने नुकतीच एक पोस्ट शेअर करत म्हटले की, ती तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी करते (Malaika Arora share fitness tips on social media).
मलायकाने क्रिमी कपसह एका फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने राखाडी रंगाचा सॅटिन नाईट सूट परिधान केला आहे आणि तिचे केस बांधलेले आहेत. हा फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले, ‘मलायकास् ट्रु टिप, दिवसाची सुरुवात, कसरत आणि पौष्टिक गोष्टी खाणे. तंदुरुस्त राहण्यासाठी या तीन गोष्टी आवश्यक आहेत. त्यापैकी कोणालाही कमी लेखू शकत नाही. परंतु, आपणास काय वाटते त्या तीनपैकी सर्वात महत्वाचे आहे.’
यापूर्वी मलायकाने सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने सांगितले की, आपण हे तीन व्यायाम करून घरच्या घरी अॅब्स बनवू शकता. हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटले की, तुम्ही 14 दिवस हा व्यायाम करा आणि मला निकाल सांगा.
वयाच्या 47 व्या वर्षीही मलायकाची तंदुरुस्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. मलायका अरोरा बर्याचदा सांगते की, ती फक्त फिट राहण्यासाठी व्यायाम करत नाही, तर व्यायाम केल्याने तिला खूप आनंद होतो. या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या मित्राबरोबर प्लँक करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये मलायका वेगवेगळ्या प्रकारचे प्लँक करताना दिसत होती.
हा व्हिडीओ शेअर करताना मलायकाने असे कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्लँक करणे मजेदार नाही. असे कोण म्हणते? इतकेच नाही तर मलायका तिच्या फिटनेस व्हिडिओमध्ये योग्यरित्या व्यायाम कसा करायचा याबद्दल बोलते, त्याचबरोबर त्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयीही माहिती देते.
अलीकडेच मलायकाने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ती कोरोना लसीचा पहिला डोस घेताना दिसत आहे. एक आरोग्य कर्मचारी मलायकाला कोरोना लस देताना दिसत आहे. यावेळीसुद्धा मलायका अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती. ती व्हाईट कलरच्या टॉप आणि रेड मास्क परिधान केलेला दिसत आहे. फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले की, ‘आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, कारण आपण पूर्णपणे #wereinthist! योद्धांनो, या #WarAgainstVirus मिळून जिंकूया. लवकरच लस घेण्यास विसरू नका! आणि हो मी लस घेण्यास पात्र आहे!
(Malaika Arora share fitness tips on social media)
Video | बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनाया कपूरने उडवली चाहत्यांची झोप, पाहा तिचा जबरदस्त ‘बेली डान्स’
PHOTO | सिल्व्हर शिमरी ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हाय गर्मी..’