तिरुवनंतपुरम : दाक्षिणात्या सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल नेडुमंगड (Actor Anil Nedumangad Drowned) याचं शुक्रवारी निधन झालं. माहितीनुसार, 48 वर्षीय अनिल नेडुमंगड हे केरळच्या मलंकारा धरणात आंघोळीला गेले असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. अनिल नेदुमंगड हे थोडुपुझा येथे त्यांच्या आगामी सिनेमा ‘पीस’चं शूटिंग करण्यासाठी गेले होते. शूटिंग दरम्यान हा अपघात झाला (Actor Anil Nedumangad Drowned).
Nothing. I have nothing to say. Hope you’re at peace Anil etta. ? pic.twitter.com/B6hOHGffkA
— Prithviraj Sukumaran (@PrithviOfficial) December 25, 2020
अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी ट्वीट करत अनिल नेदुमंगड यांच्या निधनाची माहिती दिली. “काहीच नाही, माझ्याकडे शब्दच नाहीत काही बोलायला. अपेक्षा करतो की तुमच्या आत्म्याला शांती लाभली असेल”, असं ट्वीट त्याने केलं.
अनिल हे त्यांच्या ‘अय्यप्पनम कोशियुम’, ‘कम्मति पाड़म’, ‘नेजन स्टीव लोपेज’ आणि ‘पोरिंजू मरियम जोस’ सारख्या सिनेमांमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जायचे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल नेदुमंगड हे थोडुपुझा येथे जोजू जॉर्ड यांच्या ‘पीस’ या सिनेमाटं शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान सिनेमातील अभिनेते आणि क्रू मेंबर्सने ब्रेक घेतला. त्यानंतर अनिल आणि त्यांचे काही मित्र धरणावर पोहायला गेले. बाकीचे लोक किनाऱ्यावर थांबले, पण अनिल हे खोल पाण्यात गेले आणि पाण्याच्या प्रवाहामुळे ते बुडाले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
काही वेळाने अनिल दिसत नसल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना शोधण्यास सुरुवात केली. बराच वेळ शोधल्यानंतर अनिल यांच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनिल यांचा मृत्यू झालेला होता.
Actor Anil Nedumangad Drowned
संबंधित बातम्या :
Faraaz Khan | ‘मेहंदी’ फेम अभिनेत्याचे निधन, बॉलिवूडवर शोककळा
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील युवा अभिनेत्याचे अकाली निधन