आजकाल बिकीनी फोटो शूट किंवा टॉपलेस फोटोशूट बऱ्याच अभिनेत्रींनी केले आहेत. पण हे धाडस सर्वांनाच करणे आणि पुढे होणारे त्याचे परिणाम पेलवने जमत नाही. असच काहीसं झालं होतं एका अभिनेत्रीसोबत. अशा अनेक निर्णयामुळे तिचे करिअर तर संपलेच पण भारत सोडून जावे लागले.
बोल्ड फोटोशूटची आजही चर्चा
ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 90च्या दशकातील. ममता कुलकर्णीने केलेल्या बोल्ड फोटोशूटची चर्चा आजही होते. आणि तिच्या धाडसाचे आजही तितकेच कौतुक होते..आमिर- सलमान खान पासून सर्वांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक केले होते. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या ममता कुलकर्णीने आपली यशस्वी कारकीर्द पणाला लावली होती.
स्टारडस्ट मॅगझिनच्या फोटोशूटद्वारे ती पहिल्यांदाच प्रकाशझोतात आली होती. तिने ज्या मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं, ते मॅगझीन ब्लॅकने विकलं गेलं होतं.एवढच नाही तर तिला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शकांच्या रांगा लागल्या होत्या. पण काहींना ते रुचणारे नव्हते.
अनेकांनी तिच्या या फोटोशूटला विरोध दर्शवला होता. ममताला हे फोटोशूट चांगलंच महागात पडलं होतं. बोल्ड फोटोशूट केल्यानंतर तिला 15,000 रुपये दंड भरावा लागला. इतकंच नाही तर ममताच्या या कृतीमुळे संतप्त लोकांनी रस्त्यावर उतरून विरोध सुरू केला आणि अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळू लागल्या होत्या
अंडरवर्ल्डशी कनेक्शन
नंतर तिचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेले तसेच ड्रग माफियाशी देखील जोडले गेले. त्यानंतर तिच्या करिअरमध्ये जो उतार सुरु झाला त्यामुळे तिला भारत सोडून जावं लागलं. आता 25 वर्षांनी भारतात परत आली आहे. अभिनेत्रीने भारतात येताच तिचा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान ममता कुलकर्णी आता साध्वी बनली आहे. अभिनयाच्या जगाचा सन्यास घेतल्यानंतर तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. 2013 मध्ये तिच्या ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ॲन योगिनी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.