कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळाला (Akhil Bhartiya Chitrapat Mahamandal Directors) धर्मादाय आयुक्तांनी दणका दिला आहे. मानाचा मुजरा कार्यक्रम गैरव्यवहारातील 10 लाख 78 हजार रुपये पंधरा दिवसात भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत, अभिनेत्री अलका कुबल, अभिनेता विजय पाटकर, दिग्दर्शक विजय कोंडके सह 11 जणांना हा आदेश देण्यात आला आहे. टंकलेखनातील चुकीचा गैरफायदा घेतात पैसे लाटल्याचा तत्कालीन संचालक मंडळावर आरोप आहे (Akhil Bhartiya Chitrapat Mahamandal Directors).
माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, अभिनेता विजय पाटकर, दिगदर्शक विजय कोंडके, अभिनेत्री अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह 11 जणांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत. येत्या 15 दिवसात ही रक्कम भरली नाही, तर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
2010 ते 2015 या कालावधीत मनाचा मुजरा हा कार्यक्रम झाला होता. यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप स्पष्ट झाला होता. मात्र, टंकलेखनात झालेल्या चुकीचा फायदा घेत हे पैसे अद्याप भरले गेले नव्हते. ‘खात्यामध्ये भरा’ ऐवजी ‘खात्यामधून भरा’, असा शब्द टाईप झाल्याने त्याचा संचालकांनी वेगळा अर्थ काढला. मात्र, अखेर याला आज धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दुरुस्त करत या संचालकांना पैसे भरण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार, येत्या 15 दिवसात सर्व माजी संचालकांना पैसे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तत्कालीन संचालक मंडळाने 10 लाख 78 हजार रुपये जमा केले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
‘संगीत संत तुकाराम’ नाटकाने तिसरी घंटा वाजणार, संजय नार्वेकर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ साकारणार!https://t.co/FyDbZqcJOy#SangeetSantTukaram #SanjayNarvekar #entertainmentnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 10, 2020
Akhil Bhartiya Chitrapat Mahamandal Directors
संबंधित बातम्या :
Shocking | अजय देवगणचा दृश्यम पाहून तरुणाकडून गर्लफ्रेंडचा खून, कारण आलं समोर…