मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याच्या मामांचे नुकतेच निधन झाले. मामाचा फोन उचलू शकलो नाही, त्याला कॉल बॅक करायचा राहिला, आणि दुसऱ्याच दिवशी मामा सोडून गेल्याची दुःखद बातमी आली, असं सांगताना पुष्कर जोग हळवा झाला. या कठीण काळात प्रियजनांच्या संपर्कात राहा, असं आवाहन पुष्करने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना केलं. (Marathi Actor Pushkar Jog cries remembering Mama on Instagram Live reel video while telling sudden death of Uncle)
“हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे, तेव्हा हेवेदावे, रुसवे फुगवे, वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार आणि आप्त स्वकीयांसह संपर्कात रहा. कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका” अशी कळकळीची विनंती पुष्करने केली.
काय म्हणाला पुष्कर जोग?
“13 एप्रिल म्हणजे पाडव्याच्या दिवशी मला माझ्या गोव्याच्या मामाचा फोन आला. मला म्हणाला कसा आहेस, मुंबईची परिस्थिती कशी आहे, काळजी घे. नुकतीच माझी एक फिल्म रिलीज झाली होती. मी त्याला विचारलं, मामा माझा सिनेमा कधी बघणार आहेस? तो म्हणाला माझ्याकडे ओटीटी चॅनेल नाहीये, मी म्हटलं हरकत नाही मामा, दोन-तीन महिन्यांनंतर चॅनेलवर फिल्म येईल, तेव्हा तू बघ” असं फोनवरील संभाषण पुष्करने सांगितलं
“गोव्याचा सतीशमामा गेला”
“त्यानंतर 21 एप्रिलला सकाळी 8 वाजता मामाचा मला परत फोन आला. मला लवकर उठायची सवय नसल्यामुळे मी त्याचा फोन उचलू शकलो नाही. त्याच दिवशी त्याला कॉल बॅक करणं राहून गेलं. 22 एप्रिलला, म्हणजे त्याच्याच दुसऱ्या दिवशी मला माझ्या कुटुंबाकडून समजलं की गोव्याचा सतीशमामा गेला.” असं सांगतानाच पुष्करला अश्रू अनावर झाले.
“खूप वाईट वाटलं, मी त्याचा फोन का नाही उचलला. आपण नेहमी, आपल्या मित्र-नातेवाईकांचा फोन येतो, तेव्हा म्हणतो, जाऊदे नंतर करु. असं नका करु, आता मिस्ड कॉल नको, कॉल बॅक करा, त्यांना विचारा, कसे आहात, सगळं व्यवस्थित आहे ना, त्यांना सांगा आम्ही आहोत.” असं आवाहन पुष्करने चाहत्यांना केलं.
“आपली माणसं न सांगताच सोडून चालली”
“हल्ली कोरोनामुळे इतकी भीती निर्माण झाली आहे, की आपली माणसं न सांगताच सोडून चालली आहेत. त्यांना फोन करा, कठीण काळात एकमेकांसोबत असल्याचं सांगा. आपण सगळे एकत्र राहूया, एकमेकांना मदत करुया, कृपा करुन कोणाशी वाईट वागू नका, सगळ्यांशी चांगले राहा” असंही पुष्कर म्हणाला. (Pushkar Jog cries remembering Uncle)
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
VIDEO | ‘येऊ कशी तशी…’च्या सेटवर ‘शकू’साठी पत्र, शुभांगी गोखलेंसह सगळ्यांच्या डोळ्याला धार
(Marathi Actor Pushkar Jog cries remembering Mama on Instagram Live reel video while telling sudden death of Uncle)