अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्याचे फोटो हृताने तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत.
हृता आणि प्रतिक यांनी काल म्हणजेच 18 मेला लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि मोजकी मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
हे फोटो शेअर हृताने करताना "हा आजचा फोटो आहे आणि कायमस्वरूपीसाठी आम्ही एकत्र आलोय", असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या फोटोवर अनेकांची कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातल्या तरूण मुलांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आणि लाखों दिलो की धडकन अशी ओळख असलेल्या हृताने काही दिवसांआधी साखरपुडा करत अनेकांची हृदयाचा चक्काचूर केला होता. पण तरीही तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम आणि पुढच्या सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
हृता दुर्गुळे हिने 'फुलपाखरू' या मालिकेत वैदेही हे पात्र साकारलं. या पात्राने तिला महाराष्ट्रातल्या घरा-घरात पोहोचवलं. सध्या ती मन' उडू उडू झालं' या झी मराठीवरच्या मालिकेत दीपिका हे पात्र साकारतेय. तर प्रतिक शाह हा दिग्दर्शक आहे. त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.