मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक अशी ओळख असणारी अभिनेत्री पूजा सावंत सध्या चांगलीच चर्चेत आहे. पूजा सावंत ही महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. नेहमी आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असलेली पूजा सावंतच्या अफेअर्सच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. पूजा ही एका मराठी अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (Pooja Sawant Dating With Gashmeer Mahajani Trends On Social media)
हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत डँशिंग पर्सनॅलिटी अशी ओळख असणारा गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. व्हॅलेंटाईन वीक सुरु असतानाच या दोघांमधील काही खास मॅसेजेस समोर आले आहेत. यात गश्मीरने पूजासाठी काही तरी खास प्लॅन केल्याचेही म्हटलं आहे.
गश्मीर महाजन आणि पूजा सावंतची चॅट
गश्मीर – कशी आहेस? उद्याचा काय प्लॅन काय? काही स्पेशल
पूजा – उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. माझी फॅमिली हाच माझा व्हॅलेंटाईन असल्याने मी त्यांच्यासोबतच वेळ घालवणार आहे.
गश्मीर – चल उद्या भेटू, मला तुला एक सरप्राईज द्यायचंय.
पूजा – तू मस्ती करतोस का?
गश्मीर – नाही खरचं सांगतो.
पूजा – मी खरच फार उत्सुक आहे. आताच सांग ना प्लीझ
गश्मीर – उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. उद्या वेळ काढ. काहीतरी स्पेशल आहे.
पूजा – वाट बघते.
ही चॅट्स पुजा आणि गश्मीरमधील आहे. त्यामुळे त्या दोघांचं काहीतरी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. पण हा नेमका प्लॅन काय याची अद्याप काहीही माहिती नाही.
गश्मीर आणि पूजामधील हे चॅट पाहिल्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण ही चॅट एखाद्या चित्रपट आणि वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी करण्यात आले आहेत का? हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे याची खरी माहिती उद्याच प्रेक्षकांना कळणार आहे.
दरम्यान पुजाने काही वेळापूर्वीच ‘प्रेमाची व्याख्या …… माहीत आहे कोणाला ?#waitfortomorrow’ असं कॅप्शन देत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच आता ही चॅट समोर आल्याने हा एखादा पब्लिक स्टंट असल्याचे बोललं जात आहे. (Pooja Sawant Dating With Gashmeer Mahajani Trends On Social media)
संबंधित बातम्या :