मुंबई : छोट्या पडद्यावरची बहुचर्चित जोडी अर्थात अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) यांचा ब्रेकअप सध्या चर्चेत असतानाच, आता शिव आणखी एक दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला आहे. शिवला या अभिनेत्रीसोबत बघताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यांची ही केमिस्ट्री आणि हा रोमँटिक अदाज केवळ एका पुरस्कार सोहळ्यातील डान्स पर्फोर्मंससाठी होता. शिवसोबत दिसलेली ही अभिनेत्री म्हणजे ‘डान्सिंग क्वीन’ आयुषी भावे (Marathi Bigg Boss Fame Shiv Thakare sizzling dance with actress aayushi bhave).
‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकताच शिवचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या रोमँटिक व्हिडीओने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत शिव एका अभिनेत्री आयुषी भावेसह रोमँटिक अंदाजात दिसतोय.
या व्हिडीओत शिव आणि आयुषी रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ पाहून प्रश्न पडला होता की, नेमकी ही जोडी रोमान्स करताना कशी दिसतेय? तर, अनेकांना वीणा कुठे गेली?, असा प्रश्न पडला होता.
नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यासाठी शिव आणि आयुषीने परफॉर्म केले आहे आणि याचदरम्यान दोघांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत दोघांचा रोमँटिक अंदाज तर, दिसतोय पण त्यासोबत दोघांची सिझलिंग केमिस्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधतेय. शाहरुख खान-करीना कपूरच्या ‘अशोका’ चित्रपटातील ‘सन सनन’ या गाण्यावर हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे (Marathi Bigg Boss Fame Shiv Thakare sizzling dance with actress aayushi bhave).
‘बिग बॉस’च्या घरात शिव-वीणा यांनी एकमेकांची नावं हातावर गोंदवून घेतली होती. इतकेच नाही तर, या घरातून बाहेर पडल्यावरही सोशल मीडिया पेजवर शिव कधी एकटा दिसला नाही आणि वीणाही कधी एकटी दिसली नाही. ही जोडी नेहमीच एकत्र दिसत होती. मात्र, आता ही जोडी एकत्र दिसणं अगदीच दुर्मिळ झालं आहे. तसे एरव्ही एकत्र दिसणारे शिव-वीणा ही जोडी, शिवच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमात मात्र गैरहजर होती. नुकताच शिवने ‘बी रिअल’ हा परफ्यूम ब्रँड लॉन्च केला आणि या लॉन्चिंग पार्टीमध्ये त्याची अत्यंत जवळची मैत्रीण आणि लवकरच त्याच्या आयुष्याची होणारी साथीदार वीणा मात्र कुठेच दिसली नाही. या सोहळ्याला वीणाचं नसणं, हे या चर्चेला निमित्त ठरलं आहे.
नेहमी दोघांचेही एकत्र फोटो ते चाहत्यांसह शेअर करायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांनी सोशल मीडियावर काहीच गोष्टी शेअर केल्या नाहीत. त्यामुळे चाहत्यांनी नात्याबद्दल विचारल्यानंतर शिव ठाकरेने त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले आहे. याबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला, ‘आम्ही दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहोत. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत. योग्य वेळ आली की, नक्कीच लग्नाचा विचार करू.’ आमचा ब्रेकअप झालेला नाही, लग्नबांधनात अडकायला आवडेल, असेही तो पुढे म्हणाला.
(Marathi Bigg Boss Fame Shiv Thakare sizzling dance with actress aayushi bhave)
Video | शिमरी साडी अन् डायमंड नेकलेस, ‘पाठक’बाईंच्या नव्या लूकला ग्लॅमरचा तडका! पाहा खास व्हिडीओ