अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा ‘फुलवंती’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. 11 ऑक्टोबरला ‘फुलवंती’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून आतापर्यंत हा सिनेमा थिएटरमध्ये हाऊसफुल होतोय. शिवाय ओटीटीवर देखील या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. प्रेक्षकांनी ओटीटीवर देखील या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी हिने ‘फुलवंती’ ही भूमिका साकारली. नुकचतंच या सिनेमाची सक्सेस पार्टी झाली. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री अमृता खानविलकर ही देखील या सक्सेस पार्टीला हजर होती. यावेळी प्राजक्ता माळी आणि अमृताने मदनमंजिरी गाण्यावर थिरकल्या.
पॅनोरमा स्टुडिओज, मंगेश पवार अॅण्ड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘फुलवंती’ या चित्रपटाने 50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला असून प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा चित्रपट 50 दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये आपली जादू टिकवतो आणि ‘फुलवंती’ने हा विक्रम करून दाखवला आहे.
प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केलीय, चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण केले आणि ओटीटीवर दणदणीत ओपनिंग मिळवली. ह्याची #party व्हायला, द्यायला हवी ना.. #muchneeded #gettogether #missed those who’re #missing#Love those who join to #celebrate with us (तरी #host भूमिकेमुळे कमी नाचल्याची खंत आहे.🥲 पुढल्या पार्टीत कसर भरून काढेन. ), अशी पोस्ट प्राजक्ताने शेअर केलीय.
प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केलीय, चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण केले आणि ओटीटीवर दणदणीत ओपनिंग मिळवली. ह्याची #party व्हायला, द्यायला हवी ना.. #muchneeded #gettogether
#missed those who’re #missing#Love those who join to #celebrate with us (तरी #host भूमिकेमुळे कमी नाचल्याची खंत आहे.🥲 पुढल्या पार्टीत कसर भरून काढेन. ), अशी पोस्ट प्राजक्ताने शेअर केलीय.
हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर देखील प्रदर्शित झाला असून तिथेही ‘फुलवंती’ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी खास सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अमृता खानविलकर हिने विशेष उपस्थिती दर्शवून या पार्टीला चारचांद लावले. यावेळी प्राजक्ता आणि अमृताने ‘मदनमंजिरी’ या जबरदस्त लावणीवर कमाल सादरीकरणही केले. या सक्सेस पार्टीत सर्वच टीमने हे यश साजरे केले.
या चित्रपटाचे संवाद, लेखन आणि दिग्दर्शन अनुक्रमे प्रवीण विठ्ठल तरडे आणि स्नेहल प्रवीण तरडे यांनी केले आहे. तर छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये सांभाळली आहे.