लाजाळूच्या झाडाएवढी नाजूक…; प्राजक्ता माळीच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती
Actress Prajkta Mali Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. पिवळ्या रंगाच्या प्राजक्ताच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत या लूकला दाद दिली आहे. लाजाळूच्या झाडाएवढी नाजूक, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. वाचा सविस्तर...
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आताही तिने खास पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
2 / 5
दिल हारा रे... म्हणत प्राजक्ता माळीने यलो कलरच्या या ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. माझ्या टीमने हा लूक तयार केल्याचंही प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्राजक्ताची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
3 / 5
प्राजक्ताच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत लूकला दाद दिली आहे. काय बोलू मी... तुम्हाला बघून एकच आठवलं. आपण लाजाळूच झाड बघितलं असेलच या महिन्यात त्याला तूर्रे लागतात ते जेवढे नाजुक असतात तेवढाच नाजुक आपण मला वाटतात. अगदी मनातलं सांगतोय. भावना समजल्या असालच, अशी कमेंट प्राजक्ताच्या चाहत्याने केली आहे.
4 / 5
आजचा फोटो अगदी मनाला चटका लावणारा आहे आणि मला तुझ्याबद्दल वेड लावले आहे प्राजू आणि माझ्या हृदयाची धडधड तुझ्यासाठी माझ्या प्रिय गोड हृदयाची राणी, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. सो देख कर तिरे रुख़्सार ओ लब यक़ीं आया.. कि फूल खिलते हैं गुलज़ार के अलावा भी, असंही प्राजक्ताच्या चाहत्याने म्हटलं आहे.
5 / 5
'फुलवंती' हा प्राजक्ता माळीचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 11 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल. या सिनेमात प्राजक्ता मुख्य भूमिकेत आहे. तसंच तिने या सिनेमाची निर्मिती देखील केली आहे.