अजिंक्य राऊत आणि शिवानी बावकर यांचं ‘नातं नव्याने’ फुलतंय!, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Jun 18, 2022 | 12:31 PM

एव्हरेस्ट म्युझिकने ‘नाते नव्याने’ हे गाणे शुक्रवारी प्लाझा सिनेमा येथे 17 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदर्शित केले. या गाण्याचा व्हिडीओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला असून तो अत्यंत देखणा झाला आहे. याप्रसंगी अजिंक्य राऊत, शिवानी बावकर आणि इतर कलाकार तसेच दिग्दर्शक ओमकार एच माने, गायक हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, संगीत दिग्दर्शक श्रवण दंडवते, गीतकार मुरलीधर राणे आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.

अजिंक्य राऊत आणि शिवानी बावकर यांचं नातं नव्याने फुलतंय!, पाहा व्हीडिओ...
Follow us on

मुंबई : एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या एव्हरेस्ट म्युझिकने ‘नाते नव्याने’ (Nate Navyave) हे ‘थोडे अलवारसे, थोडे हळुवारसे…’ या मुखडयाचे प्रेमगीत प्रदर्शित केले असून एव्हरेस्ट म्युझिकच्या युट्युबवर या व्हीडीओला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. शुक्रवारी 17 जून 2022 रोजी दुपारी दादर येथील प्लाझा सिनेमाच्या चौथ्या मजल्यावर प्रीव्ह्यू थिएटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत या गाण्याचा शुभारंभ झाला. त्या आधी बुधवारी या गाण्याचे ट्रेलर आणि टीझर प्रकाशित झाले असून त्यांना संगीत रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. याप्रसंगी अजिंक्य राऊत (Ajinkya Raut), शिवानी बावकर (Shivani Baokar) आणि इतर कलाकार तसेच दिग्दर्शक ओमकार एच माने, गायक हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, संगीत दिग्दर्शक श्रवण दंडवते, गीतकार मुरलीधर राणे आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.

एव्हरेस्ट म्युझिक हे एक अत्यंत लोकप्रिय असे युट्युब चॅनेल असून त्यावर 450 हूनही अधिक गाणी आहेत आणि त्यांना आत्तापर्यंत कोटींमध्ये प्रेक्षकसंख्या लाभली आहे. ही गाणी विविध प्रकारांमधील आहेत आणि त्यांमध्ये स्वतंत्र गाणी, भक्तीपर गीते, प्रेमगीते, उत्सवाची गाणी, नृत्ये, प्रेरणागीतांचा समावेश असूनही गाणी चित्रपट आणि स्वतंत्र अल्बममधील आहेत. त्याशिवाय या गाण्यांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषांमधील मुलांसाठीच्या गाण्यांचाही समावेश आहे. त्यामुळे ही गाणी घराघरात लोकप्रिय झाली आहेत. त्याशिवाय यातील गाणी ही विविध प्रकारांमध्येही विभागली गेली आहेत. म्हणजे गणपती बाप्पा, अंबे दुर्गे, विठ्ठल या देवतांची वेगळी भक्तिगीते या चॅनेलवर आहेत तर शिवाजी महाराजांवरील प्रेरणागीते तसेच चित्रपटगीतांचाही त्यात समावेश आहे.

एव्हरेस्ट म्युझिकने ‘नाते नव्याने’ हे गाणे शुक्रवारी प्लाझा सिनेमा येथे 17 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदर्शित केले. या गाण्याचा व्हिडीओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला असून तो अत्यंत देखणा झाला आहे. याप्रसंगी अजिंक्य राऊत, शिवानी बावकर आणि इतर कलाकार तसेच दिग्दर्शक ओमकार एच माने, गायक हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, संगीत दिग्दर्शक श्रवण दंडवते, गीतकार मुरलीधर राणे आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

या गाण्याचे टीझर आणि ट्रेलर बुधवारी दाखल करण्यात आले होते. त्यांना संगीत रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. या टीझर आणि ट्रेलरमध्ये या गाण्याची एकूण पार्श्वभूमी समोर येते. हे गाणे एका प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ही प्रेमकथा आहे मायरा आणि जय यांच्यातील. काहीशी गुंतागुंतीची आणि काहीशी गोंधळाच्या परिस्थितीतील ही प्रेमकथा आहे. यातील प्रेमाच्या भावना या नितळ आहेत, पण नायक मात्र नायिकेसमोर त्या मांडायला कचरतो आहे. या गोष्टी स्पष्टपणे समोर येतात आणि त्यामुळे मग गाण्याच्या मुख्य व्हिडीओबद्दलची उत्सुकता अधिक ताणली जाते.

“आम्ही या गाण्याच्या व्हिडीओच्या माध्यमातून एक अनोखा असा प्रयोग मराठीमध्ये केला आहे. गाण्याचा हा व्हिडीओ युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरात जाणार आहे. अशाप्रकारचे अनेक प्रयोग मराठीमध्ये करण्यास आम्ही बांधील आहोत. आमची पूर्ण खात्री आहे की, आमचा हा प्रयोग मराठी प्रेक्षकांना आमच्या याधीच्या प्रयोगांप्रमाणेच भावेल. याआधीच्या आमच्या प्रयोगांना रसिकांना उत्तम प्रतिसाद दिला होता,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट एलएलपीचे संजय छाब्रिया यांनी काढले आहेत.

एव्हरेस्ट म्युझिकने आपल्या युट्युब वाहिनीवर कित्येक आघाडीच्या कलाकारांची लोकप्रिय गाणी उपलब्ध करून दिली आहेत. त्यात सुरेश वाडकर, सुदेश भोसले, अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अजय-अतुल आदींचा समावेश आहे. त्यातील काही गाण्यांना तर तब्बल 60 दशलक्षांच्या घरात प्रेक्षकसंख्या मिळाली आहे. कुठल्याही मराठी युट्यूब वाहिनीसाठी हा एक विक्रम आहे.