‘आम्ही जरांगे’ सिनेमात ‘या’ दिग्गज अभिनेत्याने साकारली अण्णासाहेब पाटलांची भूमिका

| Updated on: Jun 01, 2024 | 12:08 PM

Amhi Jarange Movie Update : मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे नेते म्हणजे अण्णासाहेब पाटील... 'आम्ही जरांगे' या सिनेमात अण्णासाहेब पाटील यांची भूमिका एका बड्या अभिनेत्याने साकारली आहे. कोण आहे हा अभिनेता? भूमिकेविषयी या अभिनेत्याने काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

आम्ही जरांगे सिनेमात या दिग्गज अभिनेत्याने साकारली अण्णासाहेब पाटलांची भूमिका
Image Credit source: TV9
Follow us on

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा चित्रपट प्रक्षकांच्ये भेटीला येत आहे. येत्या 14 जूनला हा सिनेमात प्रदर्शित होणार आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा उभारणारे नेते म्हणजे अण्णासाहेब पाटील… ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पुरकर अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारणार आहे.

कोण साकारणार भूमिका?

अण्णासाहेब पाटील हे मराठ्यांचे पहिले नेते होते. त्यासोबतच माथाडी कामगारांचे प्रश्न आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. अवघ्या मराठा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यामुळेच मराठा समाजाचे पहिले नेते म्हणून अण्णासाहेब पाटील यांच नाव घेतलं जातं. त्यांच्यासारखं भारदस्त व्यक्तिमत्त्व अभिनेता अजय पुरकर पडद्यावर साकारलं आहे. ‘आम्ही जरांगे’ हा सिनेमा लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अजय पुरकर म्हणाला…

अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारतानाचा अनुभव कसा होता? कोणत्या गोष्टींवर काम करावं लागलं?याबद्दल अजय पुरकर बोलता झाला. जेव्हा दिग्दर्शकांनी पहिल्यांदा मला या चित्रपटाविषयी सांगितले तेव्हा मी अण्णासाहेब पाटील यांचा फोटो पाहिला. त्यांची परदंड शरीरयष्टी आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व पाहून मला असं वाटलं, की मी हे पात्र साकारू शकतो. कारण मी प्रत्येक भूमिकेचा विचार करताना आधी आपण शारीरिक दृष्ट्या तसे दिसतोय का, याचा विचार करतो. त्यानंतर मग बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतो. अण्णासाहेबांची विशिष्ट प्रकारची मिशी होती, जे मला थोडं इंटरेस्टिंग वाटलं. आणि त्यांनी ती मिशी कायम राखली होती. ते एक उमदे व्यक्तिमत्त्व होते. आणि म्हणूनच ती बॉडी लेंग्वेज, तसा आवाज वापरण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यासोबतच भाषेचा लहेजादेखील ग्रामीण ठेवून मी हे पात्र रंगवलं आहे, असं अजय पुरकर म्हणाला.

नारायणा प्रोडक्शन निर्मिती केलेल्या ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठयांचा लढा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील,डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या भन्नाट क्रांतिकारी चित्रपटाची कथा – पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह आहेत.