मुंबई : बॉलिवूडची दिलखेचक अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) जिच्या अदांपुढे सगळेच घायाळ होतात.फॅन्स तिच्या एका झलकसाठी पागल होतात.बॉलिवूडमध्ये तिने उत्तम काम केल्यानंतर ती आता मराठी चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवूडच्या प्रतितयशानंतर तिने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला.तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड दर्शकांना उत्कृष्ट अदा दाखवल्यांनतर सनी मराठीमध्ये दुसऱ्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.लवकरच सनी लियोनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये (Amdar Niwas) ‘शांताबाई‘ (Shantabai) या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
यापूर्वी सनीने बॉईज या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती.आता सनी आमदार निवासामध्ये ‘शांताबाई’ या गाण्यावर आपला जलवा दाखवणार आहे.आगामी आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँग ची बॉलीवुड ने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली असून आधुनिक ‘शांताबाई’चा अवतार पाहायला सगळेच उत्सुक आहेत
शांताबाई या गाण्याने 2015 मध्ये महाराष्ट्रातच नाही संपूर्ण जगात अक्षरश:धुमाकुळ घातला होता.आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ करोड हुन जास्त व्हीज असून सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक ‘शांताबाई’ म्हणून सनी लियोनी दिसणार आहे.बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांच मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर दिली आहे.
‘शांताबाई’ या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या सनी लिओनीच्या दिलखेच अदांनी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. शांताबाई या गाण्याच्या निमित्ताने गायक संजय लोंढे याना एक मोठी संधी संजीवकुमार राठोड यांनी दिली आहे.सिनेमा सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर ‘आमदार निवास’मधून भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट आमदार निवास लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.
संबंधित बातम्या