‘दगडी चाळ 2’ सिनेमा घरबसल्या पाहा, ‘या’ दिवशी, प्रवाह पिक्चरवर!

| Updated on: Oct 18, 2022 | 3:12 PM

दगडी चाळ 2 हा सिनेमा प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी? वाचा...

‘दगडी चाळ 2’ सिनेमा घरबसल्या पाहा,  या दिवशी, प्रवाह पिक्चरवर!
Follow us on

मुंबई : मराठी सिनेमाची नवी वाहिनी म्हणजे प्रवाह पिक्चर. प्रवाह पिक्चरवर (Pravah Picture) विविध सिनेमे पाहायला मिळतात. जुन्या-नव्या सिनेमांची मेजवानी प्रवाह पिक्चर प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतं. आताही दगडी चाळ 2 हा सिनेमा प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. अंकुश चौधरी, पूजा सावंत आणि मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला दगडी चाळ 2  (Daagdi Chaawl 2) हा सिनेमा येत्या 30 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहता येणार आहे.

प्रवाह पिक्चर वाहिनीला पदार्पणातच मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेला चंद्रमुखी सिनेमा जवळपास 1 कोटी 25 लाख प्रेक्षकांनी पाहिला. पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी अश्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर प्रवाह पिक्चर वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

ब्लॉकबस्टर सिनेमा अर्थातच दगडी चाळ 2 ला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आता हा सुपरहिट सिनेमा घरबसल्या म्हणजेच प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळेल. दिवाळीच्या धामधुमीत म्हणजेच 30 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर दगडी चाळ 2 चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

चुकीला माफी नाही असं ठणकावून सांगणारे डॅडी, डॅशिंग सूर्या आणि धीरगंभीर सोनल हे त्रिकुट साकारणारे कलाकार अर्थातच मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांनी दगडी चाळ 2 मध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत. चंद्रकांत कणसे यांनीच दगडी चाळ 2 चं ही दिग्दर्शन केलं आहे. दगडी चाळ 2 सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 30 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर पाहा आणि इन्जॉय करा.