मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : रिंकू राजगुरु… पहिलाच हिट सिनेमा दिल्यानंतर रिंकू राजगुरु हिचं नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं. सैराट हा सुपटहिट सिनेमा रिंकूने केला. त्यानंतर तिने आणखीही काही सिनेमे केले. मात्र सैराटमुळे मिळालेली ओळख रिंकूला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळं ठरवते. एका गावातील सामान्य मुलगी अन् तिच्या आयुष्यातील घडामोडी रिंकूने अचूक साकारल्या. सैराटमधील आर्ची या पात्राने रिंकूला महाराष्ट्रातील घराघरात ओळख दिली. हे पात्र साकारताना रिंकूचं वजन आता पेक्षा जास्त होतं. मात्र नंतर रिंकूमध्ये मोठं ट्रान्सफरमेशन पाहायला मिळालं. हे ट्रान्सफरमेशन नक्की कसं झालं? याविषयी रिंकू तिच्या मुलाखतींमध्ये व्यक्त होते.
सैराट सिनेमाच्या शुटिंगवेळी माझं वजन वाढलं. मी याच सिनेमाचं कन्नड व्हर्जनही केलं. त्यामुळे जवळपास 62 किलो वजन झालं होतं. पण त्या वजनात स्वत: ला पाहताना मलाच खूप ऑकवर्ड व्हायचं. टीममधले पण इतर लोक मला टोमणे मारायचे की, किती जाड झाली आहेस, असं… पण नंतर मी कुठेच गेले नाही. मग नंतर हळूहळू मी 12 किलो कमी केलं. मलाही वाटायचं की मी बारीक व्हावं अन् मी झाले, असं रिंकूने एका मुलाखतीदम्यान सांगितलं.
वजन कमी करण्यासाठी मी खूप स्ट्रिक्ट डाएट केलं. मी काहीच खायचे नाही. चपाती बंद केली होती. फक्त काकडी, ओट्स वगैरे खायचे. मी माझा माझाच टाएट प्लॅन केला होता. पण त्यामुळे माझ्या शरिरावर परिणाम झाला. चपाती-भाकरी याची माझ्या शरिराला सवय राहिली नाही. त्यामुळे ते पचायला त्रास होऊ लागला. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच डाएट केलं पाहिजे, असं रिंकूने सांगितलं.
मी आईला सतत म्हणते की मी प्रत्येक ठिकाणी वेगळी का दिसते? त्यावर माझी आई म्हणते की, माझं वाढतं वय आहे. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी वेगळीच दिसणार आहे. आईचं मत आहे की, लोक तुला शरिरावर काम नाही देणार. तू चांगलं काम कर लोक तुला काम देतील, असं रिंकूने एका मुलाखतीत सांगितलं.