‘आम्ही जरांगे’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

| Updated on: Jun 28, 2024 | 3:54 PM

Amhi Jarange Movie Release Date : मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'आम्ही जरांगे' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी होणार हा सिनेमा प्रदर्शित? वाचा सविस्तर...

आम्ही जरांगे सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज; या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'आम्ही जरांगे' सिनेमा
Image Credit source: tv9
Follow us on

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘आम्ही जरांगे’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या पाच जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘संघर्ष बिगर काही खरं नसतं’ अशी या सिनेमाची टॅग लाईन आहे. या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तर अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारली आहे. ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ ५ जुलै २०२४ ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

‘आम्ही जरांगे’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित ‘आम्ही जरांगे’ हा सिनेमा येत्या ५ जुलै २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी अंगावर शहारे आणणारा याच चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीझ झालाय. त्यामुळे गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे.

कोण- कोण कलाकार सिनेमात दिसणार?

‘आम्ही जरांगे’ या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारत आहेत. तर अभिनेता प्रसाद ओक याने अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारली आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत.

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा – पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत.