सध्या रील्सचा जमाना आहे. सोशल मीडियावर काही सेकंदाचे व्हीडिओ प्रचंड लोकप्रियता देऊन जातात. सोशल मीडियावर सध्या रील्सची चलती आहे. अनेकजण रील्स आणि शॉर्ट व्हीडिओतून प्रसिद्धी आणि पैसाही कमावतात. तशीच संधी तुमच्यासाठीही आहे. एका गाण्यावर रील करून तुम्हीही पैसे कमवू शकता. ‘नाच गं घुमा’ हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील ‘नाच गं घुमा’ हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यावर रील करून तुम्ही हजारोंची बक्षीसं जिंकू शकता. नक्की काय आहे ही स्पर्धा जाणून घेऊयात…
गाण्यावर रील तुम्ही बनवलं असेल. पण त्या रीलमधून तुम्ही पैसे तर कमवू शकता. शिवाय तुम्हाला या सिनेमातील कलाकारांनाही भेटता येणार आहे. ‘नाच गं घुमा’ गाण्यावर रील बनवा आणि जिंका हजारोंची बक्षिसं! टॉप 10 विजेत्यांना नाच गं घुमा चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात प्रत्यक्षात उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. यावेळी सिनेमातील कलारांनाही तुम्ही भेटू शकता. या रील स्पर्धेत 5 बक्षीसं ठेवण्यात आली आहेत.
पहिलं बक्षीस – ₹ ५१,००० /-
दुसरं बक्षीस – ₹ २५,००० /-
तिसरं बक्षीस – ₹ ११,००० /-
चौथं बक्षीस – ₹ ७,५०० /-
पाचवं बक्षीस – ₹ ५,००० /-
इंस्टाग्रामवर ‘ नाच गं घुमा प्रमोशनल साँग ‘ वापरून १० एप्रिल २०२४ पर्यंत रील पोस्ट करा.
तुमचे इंस्टाग्राम प्रोफाइल ‘Public’ असल्याची खात्री करा.
व्हिडिओ फॉरमॅट 9:16 असावा.
हॅशटॅग वापरा – #NachGaGhuma #ReelCompetition #NaachGaGhumaReelCompetition #01May2024 #MarathiFilm
टॅग करा – @naach_gaghuma @hiranyagarbha_manoranjan @everestentertainment
वेळ आणि कलात्मकतेचं बंधन नाही. तुम्ही डान्स, लिपसिंक ई. कला सादर करू शकता.
बक्षीस वितरण समारंभ कधी होणार? तर सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात हे बक्षीस वितरण होणार आहे. विजेत्यांना बक्षीस दिलं जाणार आहे.
‘नाच गं घुमा’च्या टीमकडून देण्यात आलेल्या भन्नाट ऑफरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांनी या गाण्यावर रील केलं आहे. आजी, सून आणि नातीचा हा खास व्हीडिओ…