क्यूट वैदेही परशुरामीचा बिंधास अंदाज; नव्या सिनेमातील ‘गुगली’ गाणं पाहिलंत का?

| Updated on: Jul 01, 2024 | 6:19 PM

Actress Vaidehi Parashurami New Movie : अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'एक दोन तीन चार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील नवं गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तुम्ही हे गाणं पाहिलंत का?

क्यूट वैदेही परशुरामीचा बिंधास अंदाज; नव्या सिनेमातील गुगली गाणं पाहिलंत का?
'एक दोन तीन चार' सिनेमा
Follow us on

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एक दोन तीन चार’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री वैदेही परशुरामी हिच्या या सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा आहे. या सिनेमात वैदेही बिंधास कॅरेक्टर साकारत करत आहे. निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी ही आगळीवेगळी जोडी पहिल्यांदाच मुरांबा फेम दिग्दर्शक वरुण नार्वेकरच्या ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आज या चित्रपटाचे ” गुगली” हे पहिले गाणे रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणे जणू तरुण पिढीला गुगली गुगली गुगली , पडली का? उडले उडले स्टंप का? म्हणत आव्हान देतय असं जाणवतंय.

‘गुगली’ गाणं रिलीज

म्हणतात ना प्रेमात विकेट पडते… तसंच काहीसं झालंय सम्या आणि सायलीच्या आयुष्यात…. इथे विकेट नव्हे तर दोघांचीही गुगली पडली आहे. गाण्यात दोघांच्या कॉलेजमधील पहिल्या भेटीपासून ते त्यांची गोड चहा डेट, रोज डे सेलिब्रेशन, प्रपोज ते लग्न असा एकंदरीत गोड प्रवास हया गाण्यात दाखवण्यात आला आहे.

सिनेमात कोण- कोण कलाकार?

वैदेही परशुरामी हिचा ‘एक दोन तीन चार’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 19 जुलैला आपल्या जवळच्या सिनेमागृहात हा सिनेमा पाहता येणार आहे.  ‘गुगली’ ह्या अप्रतिम गाण्याला टी (TEA) यांनी आपला आवाज दिला आहे. तर संगीत दिग्दर्शन सौरभ भालेराव ह्यांनी केलं आहे. गाण्याचे बोल अक्षय राजे शिंदे ह्यांनी लिहिले आहेत, जे अगदी मनात बसेल असं आहे.

‘एक दोन तीन चार’ या चित्रपटात निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी सोबतच इतर दमदार कलाकार जसे मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि करण सोनवणे हे कलाकार असणार आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तूत, या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांनी केली आहे.