‘नवरा माझा नवसाचा 2’चं पहिलं गाणं रिलीज; प्रसिद्ध गायकाच्या आवाजातील गाणं ऐकलंत?

| Updated on: Aug 13, 2024 | 2:13 PM

Navra Maaza Navsaacha 2 Movie Song Released : नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात हे नवं गाणं वाजणार असल्याचं दिसतंय. वाचा सविस्तर...

नवरा माझा नवसाचा 2चं पहिलं गाणं रिलीज; प्रसिद्ध गायकाच्या आवाजातील गाणं ऐकलंत?
'नवरा माझा नवसाचा 2'
Image Credit source: Instagram
Follow us on

2005 ला आलेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा सिनेमा तुम्ही पाहिलात का? या सिनेमातील डायलॉग गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात. तर आता या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. तर आता या सिनेमातील पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं ‘डम डम डम डम डमरू वाजे….’ हे गाजलेलं गाणं ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे.

‘नवरा माझा नवसाचा 2’मधील गाणं रिलिज

‘डम डम डम डम डमरू वाजे….’ या रिक्रिएट केलेल्या गाण्याचं गीतलेखन प्रवीण दवणे यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन रविराज कोलथरकर या नवोदित संगीत दिग्दर्शकाने केलंय. ‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. या सिनेमाचं पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘डम डम डम डम डमरू वाजे….’ या गाण्याबाबत दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. आदर्शने अत्यंत आपुलकीनं हे गाणं माझ्याबरोबर गायलं आहे. या गाण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे, त्याला हवं त्या पद्धतीनं या गाण्यावर काम केलं आहे. त्यामुळे हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल, असं सचिन पिळगांवकर म्हणाले.

सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे. तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.