अवधूत गुप्तेंच्या आवाजातील नवं कोरं गाणं प्रदर्शित; ‘फ्युचर बायको’ गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

| Updated on: Jul 24, 2024 | 9:56 PM

Ruchira Jadhav Future Bayko Song Release : 'बाबू' या सिनेमामधील 'फ्युचर बायको' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. अभिनेत्री रुचिरा जाधव आणि अभिनेता अंकित मोहन यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे. या गाण्याची सोशल मीडियावर सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. वाचा...

अवधूत गुप्तेंच्या आवाजातील नवं कोरं गाणं प्रदर्शित; फ्युचर बायको गाण्याची सोशल मीडियावर चर्चा
बाबू सिनेमा
Image Credit source: tv9
Follow us on

‘बाबू’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच आगरी- कोळी स्टाईलने दिमाखात पार पडला. प्रेम, ऍक्शन, स्टाईल, धमाका, राडा असे मनोरंजनाचे पॅकेज असणाऱ्या या चित्रपटातील एक नवीन गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘फ्युचर बायको’ असं या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा दमदार आवाज लाभला आहे. मनातील प्रेमभावना प्रेयसीसमोर व्यक्त करणाऱ्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं आहे. ऋषिकेश कामेरकर यांचं या धमाल गाण्याला संगीत लाभलं आहे.

‘फ्युचर बायको’ गाणं रिलीज

अंकित मोहन आणि रुचिरा जाधव यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात बाबू शेठची जगावेगळी प्रपोज करण्याची स्टाईल आणि सुप्रियाचे नखरे दिसत आहेत. आगरी भाषेतील गोडवा आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत या गाण्यात दिसत आहे. ‘फ्युचर बायको’ हे गाणे प्रेमात असणाऱ्या प्रत्येकाचं मन घायाळ करेल असंच आहे. 90 च्या शतकातील ‘बाबू शेठ’ च्या आयुष्याची ही कथा आहे. ‘बाबू’ चा बाबूशेठ कसा होतो, हे जाणून घ्यायचे असल्यास हा चित्रपट बघावा लागेल.

‘फ्युचर बायको’ या गाण्याबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या गाण्याची संगीत टीम अतिशय कमाल आहे. त्यामुळे हे गाणं अधिकच जबरदस्त झालं आहे. नव्वदच्या दशकातील प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणारे हे गाणं आहे. हे गाणं ऐकायला जितकं मजेदार आहे तितकीच गंमत ते पाहाण्यातही आहे. मला खात्री आहे, आताच्या पिढीलाही हे गाणं तितकंच आवडेल. आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी हे गाणं बेस्ट आहे, असं ते म्हणाले.

सिनेमात कोण-कोण कलाकार

सुनीता बाबू भोईर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात अंकित मोहन, रुचिरा जाधव, नेहा महाजन, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव, मंदार मांडवकर, पूनम पाटील आणि राजेंद्र जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मयूर मधुकर शिंदे यांनी दिग्दर्शनासहित लेखनाची धुरा सांभाळली असून येत्या 2 ऑगस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.