सई ताम्हणकर झळकणार नागराज मंजुळेंच्या वेबसिरिजमध्ये; म्हणाली, माझं ते स्वप्न…

| Updated on: Jun 13, 2024 | 5:32 PM

Sai Tamhankar in Nagragraj Manjule Matka King Movie : अभिनेत्री सई ताम्हणकर ही नागराज मंजुळे यांच्या सिनेमात झळकणार आहे. कोणत आहे हा सिनेमा? नागराज मंजुळे सोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण होतंय असं सई का म्हणते? कधी होणार रिलीज होणार? वाचा सविस्तर...

सई ताम्हणकर झळकणार नागराज मंजुळेंच्या वेबसिरिजमध्ये; म्हणाली, माझं ते स्वप्न...
सई ताम्हणकर, नागराज मंजुळे
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. अमेझॉन प्राईमने नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ ची अधिकृत घोषणा केली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या प्रोजेक्टचा भाग असणार आहे. ‘मटका किंग’ या वेबसिरिजमध्ये सई ताम्हणकर मुख्य भूमिका साकारणार आहे. 2024 हे वर्ष सई ताम्हणकरसाठी खास आहे. काही दिवसापूर्वी एक्सेल एंटरटेनमेंटसोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा करत सईने तिच्या बॉलिवूड प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती आणि आता तिने आणखी एका प्रोजक्टची घोषणा केलीय.

 ‘मटका किंग’मध्ये सई झळकणार

संपूर्ण जगाला ‘सैराट’ करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजिते फिल्ममेकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ वेबसिरिजमध्ये सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 2024 हे वर्ष सईसाठी बॉलिवुडमय ठरतंय. एकामागोमाग एक असे दमदार प्रोजेक्ट्स ती करणार आहे. ‘भक्षक’ या हिंदी वेब शोनंतर सई ने ‘अग्नी’ ‘ग्राउंड झिरो’ आणि आता ‘मटका किंग’ या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये सई झळकणार आहे.

2024 मध्ये सई बॉलिवूडमध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार असल्याची माहिती आहे. ‘मटका किंग’चं शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरू झाल्याचं देखील या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विजय वर्मा आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी असलेल्या या शो मध्ये सई मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘मटका किंग’ बद्दलची घोषणा प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी तर आहेच पण सई यात काय भूमिका साकारणार हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे. सई ताम्हणकर आणि नागराज मंजुळे यांचा हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे. म्हणून यातून काय सिनेमॅटिक अनुभव अनुभवायला मिळणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

सईची प्रतिक्रिया काय?

नागराज मंजुळे सोबत काम करण्याची इच्छा माझी होती आणि ही गोष्ट माझ्या विश लिस्टमध्ये देखील होती. आता आम्ही मटका किंग सारख्या प्रोजेक्टसाठी आम्ही सोबत काम करतोय. या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होते याचा आनंद आहे. अनेक इंटरव्ह्यू आणि सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त देखील केली होती आणि स्वप्नपूर्ती होतेय. म्हणून एक वेगळं सुख आहे. अमेझॉन प्राईमसाठी ही वेब सीरिज आम्ही करतो आहोत आणि विजय वर्मा देखील त्याचा एक भाग आहे, असं सई ताम्हणकर या वेबसिरिजबद्दल म्हणाली.