मुंबई : ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या सर्वोत्तम साहित्य कृती ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरिला’ आणि ‘झूल’ या चांगदेव चतुष्ट्य म्हणून प्रसिद्ध आहेत. या चारही कादंबऱ्या अभिनेते शंभू पाटील यांच्या आवाजात ऑडिओबुक्स स्वरूपात सप्टेंबर महिन्यात दर आठवड्याला स्टोरीटेलवर प्रकाशित होत आहेत!
चांगदेव पाटील हा खेड्यात, भल्या मोठ्या वाड्यात, खंडीभर माणसांच्या कुटुंबात, अर्धवट लुच्च्या पण कष्टाळू आणि धूर्त – व्यवहारी पण पोकळ प्रतिष्ठेच्या मागे असणाऱ्या बापाचा, मुंबईत जाऊन विदेशी – म्हणजे खरंतर पाश्चिमात्य व्यक्तिवादी – मूल्यांच्या आधारे इंग्रजीत एम.ए. केलेला मुलगा. एम.ए.ची मुंबईतली दोन वर्षे व त्यानंतर नोकरीची – तीन वेगवेगळ्या गावी घालवलेली तीन वर्षे, असा पाच वर्षांचा एकूण प्रवास म्हणजे चांगदेव चतुष्टय.
मुळे घट्टपणे शेतीत, खेड्यात, प्रचंड अडगळीच्या वस्तूंनी भरलेल्या संस्कृतीत रुतलेली तर पौगंडावस्थेपासून अतिशय संवेदनशील मनावर विविध कलाविष्कारांच्या, विशेषतः साहित्याच्या, माध्यमातून ओळख झालेल्या विविध संस्कृती, त्यांतील विचारधारा, त्यांतली मूल्ये यांचा झालेला संकर, यांनी चांगदेवला हलवून – भेलकांडून सोडलेला. त्यातच स्वातंत्र्य फोल ठरवत, जातींची गुंतवळ घट्ट करत जाणारी राजकारणाची दिशा, समाजात पडणारे तिचे प्रतिबिंब, अव्यावहारिक शिक्षण देणारी धंद्यासाठी काढलेली खंडीभर कॉलेजं आणि असली कॉलेजं चालवायला लागणारे खंडीभर मास्तर पैदा करणाऱ्या यंत्रणेत पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून आणि नंतर मास्तर म्हणून चांगदेव आपल्याला बिढार-हूल-जरीला-झूल या चार कादंबऱ्यांतून भिडत जातो.
स्टोरीटेल इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या 11 भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करते. मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही कधीही ऐकण्यासाठी साहित्यप्रेमी स्टोरीटेल मराठीला पसंती देत आहेत.
‘स्टोरीटेल’ या अॅपमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांतील दोन लाखांहून अधिक पुस्तके कधीही, कुठेही ऐकण्याची संधी आहे. ज्यामध्ये मराठी साहित्य विश्वातील नामवंत लेखकांपैकी ह. ना. आपटे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, व. पु. काळे, रणजित देसाई, साने गुरुजी, सुनीता देशपांडे, अरूणा ढेरे आदी अनेकांचे सर्वोत्तम साहित्य स्टोरीटेल ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध आहे. हे सर्व साहित्य नामवंत अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, शुभांगी गोखले, संदीप कुलकर्णी आदींच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐकायला मिळेल.
Fact Check : लालबागच्या राजाचा जुना ‘फर्स्ट लूक’ व्हायरल, ‘बिग बी’ही फसले
हिंदीनंतर आता मराठी मंचावरही सादर होणार ‘इंडियन आयडॉल’, पाहा ‘इंडियन आयडॉल मराठी’ची खास झलक!