‘बाई गं’ हा स्वप्नील जोशीचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. रिमझिमत्या प्रेमाने, दुनियेला मोहिनी घालणारं ‘बाई गं’ चित्रपटाचं नवीन गाणं ‘चांद थांबला‘ रिलीज झालंय. मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमन्टिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात आपल्या जुन्या ऑनस्क्रीन जोडीदारासोबत म्हणजेच प्रार्थना बेहेरे सोबत रोमान्स करताना दिसतोय. या गाण्याचे बोल आणि त्याची चाल प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय. हे गाणं सध्या सिनेरसिकांच्या मनावर रूंजी घालतं आहे.
2015 मध्ये आलेला चित्रपट मितवानंतर आता हि जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करायला सज्ज झाली आहे. एका मोठ्या गॅप नंतर स्वप्नील आणि प्रार्थना एकत्र काम करतायत. त्यामुळे आपल्या आवडत्या जोडी ला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मागील काही दिवसात प्रार्थनाने आपल्या सोशल मीडियावर या गाण्याची एक झलक फॅन्स ला दाखवली होती. या गाण्यात अभिनेता स्वप्नील जोशी प्रार्थना सोबत थिरकताना दिसत आहे. कलाकार आणि संगीत सोबतच या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा तितकच सुंदर आहे.
नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चित्रपटाचा हे दुसरं गाणं आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे सह सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान सुद्धा आहे.
अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी ह्यांनी ‘चांद थांबला’ या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर वरून लिखते ह्यांचं संगीत आहे. गाण्याचे बोल समीर सामंत यांनी लिहिले आहेत. ‘चांद थांबला’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करतंय. ‘बाई गं’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. 12 जुलै पासून ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.