अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांचा नवा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. पाच जन्मांच्या बायका अन् त्यांच्या अपूर्ण इच्छा… त्यांचा नवरा पूर्ण करू शकेल का? ‘बाई गं’ या सिनेमात नात्यांमधली गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, असंच काहीसं घडलंय स्वप्निल जोशी सोबत… वर्तमान आयुष्यात तरी त्याला बायकोचं मन काही कळालं नाही. मागच्या पाच जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा तो कसा पूर्ण करतो, हे पाहणं महत्वाचं असेल.
‘बाई गं’ या भन्नाट चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीझ झालाय. या ट्रेलरमध्ये स्वप्निल जोशीची तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. कॉमेडी आणि भावनेने भरपूर असा हा ट्रेलर आहे. यात शेवटी स्वप्नीलला बाईच्या मनाला समजायला ‘बाई चं’ रूप घ्यावं लागतंय. आता या चित्रपटाचा शेवट नक्की काय असेल हे पाहणं रोमांचक ठरणार आहे.
स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांचा संसार, त्यातील अडचणी अन् मागच्या जन्मीच्या बायका… या सगळ्यात स्वप्नील जोशीची होणारी धावपळ अशी या सिनेमाची गोष्ट आहे. हा सिनेमा 12 जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.
या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहेत. ‘बाई गं’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केलं आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ हा चित्रपट 12 जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.