‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता नव्या संचात, ‘वारसा’ दिनानिमित्त रागडावर शुभारंभाचा प्रयोग होणार

| Updated on: Apr 10, 2022 | 9:37 AM

वसंत कानेटकर लिखित, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे मराठीमध्ये हजारो प्रयोग झाले आहेत. मराठी नाट्यसृष्टीतील अतिशय दिग्गज कलाकारांनी या नाटकाला न्याय दिला आहे. आता नव्या संचात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रायगडावर 18 एप्रिलला 'वारसा' दिनाच्या निमित्ताने रंगणार आहे.

रायगडाला जेव्हा जाग येते’ आता नव्या संचात, वारसा दिनानिमित्त रागडावर शुभारंभाचा प्रयोग होणार
रायगडाला जेव्हा जाग येते
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : देवाला भेटण्यासाठी देवाच्या मुळ अस्तिव असलेल्या जागीच जावं लागतं असं म्हणतात. रायगडाला (Raigad) भेट म्हणजे जणू देवाला जवळून भेटण्याची संधीच. ही संधी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ (Archaeological Survey of India) आणि मुंबई मराठी साहित्य संघ –नाटयशाखा रंगमंच (Mumbai Marathi Sahitya Sangh) सहयोगाने नाटयरसिकांना 18 एप्रिलला मिळणार आहे.रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या निमित्ताने… वसंत कानेटकर (Vasant Kanetkar) लिखित, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ (Raigadala Jevha Jag Yete) या नाटकाचे मराठीमध्ये हजारो प्रयोग झाले आहेत. मराठी नाट्यसृष्टीतील अतिशय दिग्गज कलाकारांनी या नाटकाला न्याय दिला आहे. आता नव्या संचात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रायगडावर 18 एप्रिलला ‘वारसा’ दिनाच्या निमित्ताने रंगणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जागतिक वारसा दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 18 एप्रिल 2022 रोजी सायं. 6.15 वा.विशेष कार्यक्रम रायगड किल्ल्यावर आयोजित केला आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी 60 वर्षांपूर्वी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा प्रयोग विनामूल्य सादर केला जाणार आहे. या नव्या संचात प्रमोद पवार, यश कदम, उपेंद्र दाते, मोहन साटम, सुभाष भागवत, मा.चिन्मय, मयूर भाटकर, संध्या वेलणकर व अनिता दाते हे कलाकार असून याचे दिग्दर्शन उपेंद्र दाते यांनी केले आहे. नव्या शुभारंभानंतर नाटकाचे महाराष्ट्राभर गोवा, इंदोर असे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.

“इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो. आपला इतिहास आपणच जपायचा असतो”, हाच इतिहास जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे सादरकर्ते सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज, आणि संभाजी महाराज या दोघांचेही विविध पैलू या नाटकाद्वारे प्रेक्षकांसमोर उलगडतात.

रायगडावरील कार्यक्रमाला मुंबईहून उपस्थित राहण्याची इच्छा असणाऱ्या शिवप्रेमींसाठी रूपये 2000 मध्ये सर्व समावेश (प्रवास,नाश्ता,2 जेवणसह) असलेली सोय ‘ग्लोबल प्रवासी’ तर्फे उपलब्ध केली आहे. यासाठी ग्लोबल प्रवासी च्या अर्चना 9987638522 आणि सचिन 9967452370 यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

Ayesha Takia Birthday : बॉलिवूडची क्यूट गर्ल आयेशा टाकियाचा वाढदिवस, जाणून घ्या तिच्याविषयी…

Photo Gallery | थोबाडीत मारणे भोवले..! अभिनेता विल स्मिथवर पुढील10 वर्षांसाठी Oscars ने घातली बंदी

Photo gallery | हाय गर्मी…. मौनी रॉयच्या फोटोंनी वाढवली चाहत्यांच्या हृदयाची धडधड