VIDEO : नीज माझ्या नंदलाला, गायक मंगेश बोरगावकरच्या मुलीची धाकट्या बहिणीसाठी गोड अंगाई

| Updated on: May 30, 2021 | 4:13 PM

मंगेश बोरगावकरने मीराच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत ती मोठ्या बहिणीची ड्युटी करत आहे, असं कॅप्शन दिलं आहे. (Mangesh Borgaonkar Video of Daughter )

VIDEO : नीज माझ्या नंदलाला, गायक मंगेश बोरगावकरच्या मुलीची धाकट्या बहिणीसाठी गोड अंगाई
मंगेश बोरगावकरने शेअर केला व्हिडीओ
Follow us on

मुंबई : प्रख्यात गायक मंगेश बोरगावकर (Mangesh Borgaonkar) याने आपल्या चिमुकलीचा अत्यंत गोड व्हिडीओ शेअर केला आहे. मंगेशची मुलगी मीरा अंगाई गाऊन आपल्या धाकट्या बहिणीला निजवत आहे. ‘नीज माझ्या नंदलाला’ हे गाणं मीरा गाताना दिसते. चाहत्यांनी मीरावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Marathi Singer Mangesh Borgaonkar shares Video of Daughter Meera singing song Neej Majhya Nandalala for baby Sister)

मोठ्या बहिणीची ड्युटी

मंगेश बोरगावकरने मीराच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत ती मोठ्या बहिणीची ड्युटी करत आहे, असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये मीरा तल्लीन होऊन ‘नीज माझ्या नंदलाला’ ही अंगाई गात असल्याचं दिसतं. तर तिची धाकटी बहीण स्वरा जमिनीवर झोपली आहे. मंगेश आणि पत्नी अपूर्वा आठवले यांना स्वरा आणि मीरा या दोन मुली आहेत.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात

प्रख्यात संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली ‘नीज माझ्या नंदलाला’ ही अंगाई गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या सुरेल गळ्यातून अवतरली आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केलं आहे. आपल्या परीने या गाण्याला पुरेपूर न्याय देणाऱ्या मीराकडे पाहून अनेक जणांनी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी कमेंट केली आहे.

मंगेश बोरगावकर ‘सारेगमप’तून नावारुपास

बोरगावकर कुटुंबातील अनेकांनाच सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे. ‘सारेगमप’ या संगीत रिअॅलिटी शोमधून गायक मंगेश बोरगावकरचा चेहरा घराघरात पोहोचला. मंगेशने अनेक मैफिली गाजवल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या बहिणी मधुवंती बोरगावकर, सरस्वती बोरगावकरही संगीत क्षेत्रात आहेत. आता मंगेशच्या चिमुकलीचा ओढाही त्याकडे दिसतो. (Mangesh Borgaonkar Video of Daughter)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | जाऊया डबल सीट रं… ‘देवमाणूस’मधील एसीपी दिव्याचा हवालदार शिखरेंसोबत भन्नाट डान्स

(Marathi Singer Mangesh Borgaonkar shares Video of Daughter Meera singing Neej Majhya Nandalala for baby Sister)