मी तिच्या जागी असते तर चप्पलच काढली असती…. कोणावर भडकली काजोल ?

| Updated on: Jul 05, 2023 | 12:57 PM

Kajol On Paparazzi : अभिनेत्री काजोल सध्या लस्ट स्टोरी 2 चे यश एन्जॉय करत आहे. त्याचवेळी तिने तिच्या मुलीचे कौतुक करत पापाराझींबद्दल असे उद्गार काढले ते ऐकून...

मी तिच्या जागी असते तर चप्पलच काढली असती.... कोणावर भडकली काजोल ?
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : अभिनेत्री काजोल (Kajol) ही तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या फटकळपणामुळेही ओळखली जाते. ती नेहमीच बेधडक वक्तव्य करत असते. त्यामुळे कोणाला काय वाटेल, काय फरक पडेल, याचा विचारही करत नाही. सध्या काजोल ‘लस्ट स्टोरीज 2’ मुळे चर्चत असून याच्या प्रमोशनच्या (promotions) निमित्ताने ती सतत इंटरव्ह्यू देताना दिसत आहे. त्याचदरम्यान तिला अनेक प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलतना दिसत आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने तिची मुलगी निसा ही पापाराझी किंवा फोटोग्राफर्सना कशी हँडल करते, याबद्दल बोलत होती. यावेळी मुलीचे कौतुक करताना काजोलने फोटोग्राफर्सबद्दल असे काही उद्गार काढले, जे ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. निसा सगळं चांगल्या पद्धतीने हँडल करते आहे, मी तिच्या जागी असते तर मी चप्पलच काढली असती, असे काजोलने म्हटले.

तसेच यावेळी तिने फोटोग्राफर्सने घेरल्यावर निसाच्या रिॲक्शनबद्दलही सांगितले.

 

कशी होती निसाची रिॲक्शन ?

स्टारकिड असल्याने निसा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती जिथे जाते, तिथे कॅमेरे तिचा पाठलाग करतच असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. अनेकवेळा चुकीच्या अँगलने काढलेल्या फोटोमुळे तिचे ट्रोलिंग होते. या सर्व मुद्यांवर बोलतानाच काजोलने, निसा ज्या पद्धतीने फोटोग्राफर्सना हँडल करते, त्याबद्दल तिचे कौतुकच केले.

यासंदर्भात काजोलने एक किस्साही शेअर केला. ‘ पापाराझींना कसे हाताळावे किंवा त्यांचा सामना कसा करावा, हे मी तिला शिकवू शकत नाही. ते अनुभवातून शिकता येते. तिला पापाराझींचा पहिला अनुभव जयपूरमध्ये आला. तेव्हा आम्ही दोघीच ट्रॅव्हल करत होतो. काही सेक्युरिटी नव्हती. तेव्हा 20-25 फोटोग्राफर्सनी आम्हाला घेरले आणि आरडा-ओरडा सुरू झाला. ते सगळं पाहून निसा घाबरली आणि रडायला लागली. मी तिला सरळ उचललं आणि कारमध्ये बसले. तेव्हा मी तिला सांगितलं हे लोकं तुझं काही नुकसान करणार नाहीत, ते फक्त त्यांचं काम करत आहेत. त्यांची काळजी करू नकोस. तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर कळेल, मी माझ्या मुलांना यापासून( फोटोग्राफर) दूरच ठेवलं आहे, ‘ असं काजोल म्हणाली.

मी तिच्या जागी असते तर चप्पलच काढली असती

याचबाबतीत काजोल पुढे म्हणाली की, ‘ ती (निसा) आता चांगल्या पद्धतीने वागते. माझ्यापेक्षी ती फोटोग्राफर्सशी जास्त चांगलं आणि नम्रतेने, आदर देून वागते. मी तिच्या जागी असते तर (याआधी) कधीच चप्पल काढली असती’ असे उद्गारही काजोलने काढले.