सौंदर्याची व्याख्या प्रत्येकासाठी नक्कीच वेगळी असते. त्यासाठी आजकाल कोण कोणत्या थराला जाईल असं काही सांगता येत नाही. अनेक अभिनेत्री किंवा मॉडेल्स यासाठी बोटॉक्स करतात, सर्जरी करतात. त्यावर लाखो, करोडो रुपये खर्च करतात. पण प्रत्येकावर ही ट्रिटमेंट वर्क करतेच असं नाही. तर काही जणींचा चेहरा हा खराब होतो.
बॉर्बीसारखं दिसण्याचा हट्ट महागात
असंच काहीसं ऑस्ट्रेलियातील 30 वर्षीय मॉडेलसोबत झालं आहे. ‘फेटिश बार्बी’या नावाने ही मॉडेल प्रसिद्ध आहे. तिने स्वत:ला बार्बी डॉलसारखे करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.
वयाच्या 18 व्या वर्षी तिने कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सची सुरुवात केली आणि तेव्हापासून आतापर्यंत बोटोक्स आणि फिलर्सद्वारे स्वत:च्या लुकला तिने पूर्णपणे बदलून टाकले आहे. आता तिच्या ओठांचा आकार बदलला आहे.
बॉर्बीप्रमाणे दिसण्यासाठी लाखो-करोडो खर्च
‘फेटिश बार्बी’ने बॉर्बीप्रमाणे दिसण्यासाठी बोटॉक्स आणि फिलर्स ट्रिटमेंटवर कोट्यवधी खर्च केले. बोटॉक्स आणि फिलर्स करुन या मॉडेलने तिच्या ओठांचा आकार फार वाढवला आहे, ते दिसायलाही फार विचित्र दिसत आहे. याशिवाय तिने ब्रेस्ट इंप्लांटही केले आहे. लीप फिलर्स आणि ब्रेस्ट इंप्लांट यामुळे तिच्या शरीराचा आकार बदलला असून ती विचित्र दिसत आहे.
‘फेटिश बार्बी’ म्हणून प्रसिद्ध असलेली मॉडेल एक सोशल मीडिया पर्सनॅलिटी आहे. ती बोल्ड फोटोशूट आणि व्हिडीओ शेअर करत कायम चर्चेत राहते.
बोटॉक्स आणि फिलर्स करुन ती तिचा चेहरा खराब करेल, असं तिच्या मित्रांना वाटतं. पण, तिला त्याची पर्वा नसल्याचं ती म्हणते तसेच तिला तिचं हे रुप आवडत असल्याचंही तिने म्हटलं आहे.
दर 3 ते 4 महिन्यांनी लिप फिलर्स करून घेते
ती दर 3 ते 4 महिन्यांनी लिप फिलर्स करून घेते, ज्यामुळे तिचे ओठ अधिक मोठे दिसतात. आतापर्यंत बोटॉक्स ट्रिटमेंटवर तिने 32 लाख ते 53 लाख रुपये खर्च केले आहेत. पुढेही तो खर्च वाढताना दिसत आहे. तिला बोटॉक्सचे व्यसन लागले आहे, असंही ती सांगते. वयाच्या 18 व्या वर्षापासून ती लिप फिलर वापरतेय.
एकीकडे तिचे मित्र तिच्यासाठी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगला सामोर जावं लागतं आहे. तसेच तिच्या या ओठांमुळे अनेकांनी ते भितीदायक वाटत असल्याचंही म्हटलं आहे.
तज्ञांचा इशारा
दरम्यान बोटोक्स आणि फिलर्सचा अत्याधिक वापर आरोग्यावर गंभीर प्रभाव पाडू शकतो असं तज्ञांनी म्हटलं आहे. या शस्त्रक्रियेमुळे शारीरिक समस्यांसोबत मानसिक तणावही होऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. ‘फेटिश बार्बी’चा अनोखा लुक आणि तिचे बार्बी डॉलसारखे दिसण्याचा ध्यास सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.