अंडरवर्ल्ड डॉनची गर्लफ्रेंड होती ही अभिनेत्री, एक चूक आणि संपूर्ण करिअर क्षणात उद्ध्वस्त .. आता काय करते ?

| Updated on: Jan 18, 2024 | 12:38 PM

Monica Bedi Birthday : मोनिकाने तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच अशी चूक केली होती, ज्यामुळे तिच्या कारकीर्दीला खीळ बसला. नंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण तिला अपेक्षित यश मिळाले नाही. खुद्द मोनिकानेच एका मुलाखतीत तिच्या मोठ्या चुकीबद्दल खुलासा केला होता.

अंडरवर्ल्ड डॉनची गर्लफ्रेंड होती ही अभिनेत्री, एक चूक आणि संपूर्ण करिअर क्षणात उद्ध्वस्त .. आता काय करते ?
Image Credit source: Instagram
Follow us on

Monica Bedi : हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळची अभिनेत्री मोनिका बेदी हिच्या कारकिर्दीत चित्रपटांपेक्षा वादच जास्त निर्माण झाले. आज, 18 जानेवारीला मोनिका बेदीचा वाढदिवस असतो. पंजाबच्या होशियारपूरमध्ये जन्मलेल्या मोनिकाचं आयुष्य बरंच चर्चेत होतं. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी अजूनही प्रसिद्धीच्या झोतात आहे. मोनिकाची चित्रपट कारकिर्दीत काही विशेष चालली नाही, पण त्यामध्ये इतरांपेक्षा तिचीच चूक जास्त आहे. एक अशी चूक, ज्यामुळे ती आजही स्वतःला कोसत असेल. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबतच्या तिच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. त्या प्रेमामुळे या अभिनेत्रीला तुरुंगातही जावे लागले होते.

मोनिकाची लाईफ चर्चेत

‘ताजमहाल’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची शानदार सुरुवात करणाऱ्या मोनिकाला फार मोठी इनिंग खेळता आली नाही. चित्रपटांमधील करिअरचा आलेख काही खास नव्हता. खरंतर, एक काळ असा होता जेव्हा ती सलमान खानसोबत काम करणार होती. पण मोनिकाच्या एका चुकीमुळे तिचं करिअर उद्ध्वस्त झालं. खरंतर एकदा सुभाष घई यांनी त्यांच्या घरी होळी पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत सर्व स्टार्स पोहोचले होते. मोनिका बेदी आणि अभिनेता दिग्दर्शक राकेश रोशन यांनीही हजेरी लावली. खुद्द मोनिकानेच एका मुलाखतीत या होळीच्या पार्टीत काय घडले हे सांगितले होते.

एका मुलाखतीत मोनिका बेदी म्हणाली, “सुभाष घईंच्या होळी पार्टीत राकेश रोशन स्वतः माझ्याकडे आले होते. ते एक अभिनेता आहेत हे मला माहीत होतं, मी त्ंयाचे चित्रपट पाहिले होते. पण ते दिग्दर्शक आणि निर्माताही आहेत हे मला माहीत नव्हतं. ते माझ्याकडे आले, आम्ही थोडं बोललं. त्यांनी मला त्यांचं कार्ड दिलं आणि उद्या भेटायला ये असं सांगितलं.’

ते तर एक अभिनेता आहेत. ते मला भेटायला कशा बोलवत आहेत, असा मी विचार केला आणि त्यांचं कार्ड फाडून फेकून दिलं. थोड्या महिन्यांनी मला माझ्या मॅनेजरने विचारलं ती तू राकेश रोशन यांना भेटत का नाहीयेस ? ते तुला सलमान खानच्या अपोझिट एका चित्रपटात कास्ट करायचा विचार करत होते. तेव्हा मी म्हणाले, मला कसं कळणार. मला माहीत नव्हतं. करण अर्जुनचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते. हा चित्रपट खूप यशस्वी झाला. यामध्ये सलमान खानसोबत मोनिकाला कास्ट करण्याचा राकेश रोशन यांचा विचार होता. मात्र नंतर ही भूमिका ममता कुलकर्णीने केली. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलही होते. याच चुकीमुळे मोनिकाने एक मोठा पिक्चर गमावला आणि तीच तिच्या आयु्ष्यातली मोठी चूक ठरली.

अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम सोबतचं प्रेम प्रकरण गाजलं

2014 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत मोनिकाने अंडरवर्ल्ड डॉनबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आमचे (अबू सालेम – मोनिका बेदी) संभाषण फोनवरून सुरू झालं. त्यानंतर अबू सालेमने त्याची ओळख दुसऱ्या नावाने करून दिली. ‘त्याने मला सांगितले की तो दुबईचा मोठा उद्योगपती आहे. हळूहळू आम्ही रोज बोलू लागलो. मी त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले, असं मोनिका म्हणाली.

खरं नाव माहीत नव्हतं
मोनिकाने पुढे सांगितले की, ‘जवळपास 9 महिने फोनवर बोलल्यानंतर आम्ही भेटण्याचा प्लॅन केला. पण तो मुंबईला यायला तयार नव्हता, म्हणून मी त्याला भेटायला दुबईला गेलो. तिथे गेल्यावर मला कळले की त्याचे खरे नाव अबू सालेम आहे. पण तेव्हा तो डॉन आहे हे मला माहीत नव्हते. ‘1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरल्यानंतर अबू सालेम दुबईहून अमेरिकेत आला होता. त्याने मला तिथेही बोलावले. पण तिथे गेल्यावर मला समजले की मी आता वाईटरित्या अडकलो आहे आणि येथून बाहेर पडणे अशक्य आहे, असही मोनिकाने नमूद केलं.

2005 मध्ये अबू आणि मोनिकाला पोर्तुगालमध्ये बनावट पासपोर्टसह अटक करण्यात आली होती. अबू सालेमसोबत मोनिकालाही तुरुंगात जावे लागले. तुरुंगातून सुटल्यानंतर मोनिका पंजाबमधील तिच्या गावी गेली कारण मुंबईत तिला कोणीही घर द्यायला तयार नव्हतं.

ती सध्या काय करते ?

प्रोफेशनल आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मोनिका बेदीकडे सध्या कोणताच प्रोजेक्ट नाही. ती छोट्या-मोठ्या जाहिराती करून गुजारण करते. सोशल मीडियावर, इन्स्टाग्रामवर मात्र मोनिका बरीच सक्रिय असते.