स्टार कास्ट : रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, एमी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री, नीना गुप्ता, बोमन इराणी, अदिती आर्या, वामिका गब्बी
दिग्दर्शक : कबीर खान
चित्रपट : 83
1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार होऊ शकलो नसलो, तरी 83 या चित्रपटाद्वारे कबीर खानने तो क्षण आपल्याला रुपेरी पडद्यावर जगण्याची संधी दिली आहे. आता यात कबीर खान कितपत यशस्वी झाला आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले असून, आगाऊ बुकिंग करून हा चित्रपट पाहण्याची तयारी करत असाल, तर त्याआधी या चित्रपट कसा आहे ते इथे वाचा.
1983 मध्ये इंग्लंडने क्रिकेट वर्ल्डकपचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी युवा खेळाडू कपिल देव यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनी एका संघाचे नेतृत्व केले, ज्याला प्रथम अंडरडॉग (क्षमता नसलेल्या व्यक्तींचा गट) म्हणून पाहिले जात होते आणि त्यानंतर त्याच संघाने 1983मध्ये देशासाठी पहिला विश्वचषक जिंकला. कबीर खानच्या ’83’ मध्ये या विश्वचषक विजेत्या संघाचा प्रवास समाविष्ट आहे, ज्याने देशाला विश्वास ठेवण्यास आणि खंबीरपणे उभे राहण्यास शिकवले.
या चित्रपटाच्या कथेत भारतीय क्रिकेट संघाने 1983च्या विश्वचषकात विजयाचा इतिहास रचताना दाखवले आहे. विश्वचषकाचे किस्से पुस्तकांमध्ये लिहिलेले असतात, पण कबीर खानने विश्वचषकाच्या प्रवासातील अनेक किस्से आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
हा चित्रपट सिनेप्रेमींसोबतच क्रिकेट रसिकांच्याही पसंतीस उतरणार आहे, यात शंका नाही. चित्रपटाच्या पहिल्या काही मिनिटांत चित्रपटातील पात्रांची ओळख करून दिली जाते, तीही पासपोर्ट क्रम वापरून. यादरम्यान संवाद आणि संभाषणेही ऐकायला मिळतात, ज्यामध्ये भारत विश्वचषक जिंकेल यावर भारतीयांचा विश्वास नसल्याचे बोलले जात आहे. या क्षणी एक गोष्ट तुमच्या मनात येते ती म्हणजे चित्रपट 1983मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा देत नाही, तर हा चित्रपट मानसन्मान मिळवून देणाराही आहे.
चित्रपट जसजसा पुढे जाईल, तसतसे तुम्ही त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न कराल. चित्रपटातील प्रत्येक दृश्यात भावना आहे. हृदयाला भिडणारी एक गोष्ट आहे. चित्रपटात अनेक ठिकाणी रिअल व्हिज्युअल्सही टाकण्यात आले आहेत. कपिल देव यांची ती खेळी देखील दिसली आहे, जेव्हा त्यांनी विश्वविक्रम केला. याशिवाय एक दृश्य संदीप पाटील आणि कपिल देव फलंदाजी करत असताना प्रेक्षक मैदानात धावत सुटतात. दिलीपला दुखापत होते आणि त्याला खूप रक्तस्त्राव होतो, तेव्हा एक दृश्य अधिक वास्तविक दाखवण्यात आले होते.
अशी अनेक वास्तविक दृश्ये आहेत, जी कबीर खानने आपल्या चित्रपटात दाखवली आहेत. कबीर खानने प्रत्येक खेळाडूमध्ये भावनेतून रंग भरले आहेत, ज्यामुळे तो एक वेगळा संघ बनतो. कृष्णमाचारी श्रीकांत (जीवा) सुद्धा विनोद करू शकतात, याची आपण कल्पना करू शकत नाही. त्याने आपल्या उच्चाराने चित्रपटात केलेले विनोद अप्रतिम आहे. यशपाल शर्मा उर्फ जतिन सरना, एमी विर्क उर्फ बलविंदर संधू आणि मदन लालच्या भूमिकेत हार्डी संधू या सर्वांनी चित्रपटात एक वेगळा जीव ओतला आहे. गंभीर प्रसंगीही या लोकांची बोलण्याची शैली 83ला अतिशय आकर्षक आणि पाहण्यायोग्य बनवते.
याशिवाय कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ (साकिब सलीम) यांच्यात एक सीन आहे, ज्यामध्ये दोघांमध्ये संभाषण नाही, पण दोघेही ज्या पद्धतीने एकमेकांना पाहतात, त्यावर बोलण्याची काही गरजच वाटत नाही. दोघंही फक्त लूक देऊन एकमेकांच्या गोष्टी समजून घेतात. चित्रपटाच्या धारदार आणि कसदार पटकथेची ही ताकद आहे. या चित्रपटात तुम्हाला वास्तविक कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ यांची झलकही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मोहिंदर अमरनाथ यांनी त्यांचे वडील लाला अमरनाथ यांची भूमिका साकारली आहे.
कोणत्याही एका कलाकाराला महत्त्व देऊन चित्रपट पुढे सरकत नाही, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्र हा या चित्रपटाचा प्राण आहे. मग, ते छोट्या भूमिका करणारे सहाय्यक कलाकार का असेना…चित्रपटातील काही दृश्ये खूपच अप्रतिम आहेत. जसे एका ठिकाणी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाच्या चेंडूने दिलीप जखमी होतो, तेव्हा संपूर्ण भारतीय संघ संतप्त होतो. हाताला दुखापत असूनही संदीप पाटील शानदार फलंदाजी करतो आणि मोहिंदर अमरनाथनेही आपली पूर्ण ताकद दाखवली. याशिवाय चित्रपटाचे अनेक संवादही चांगले आहेत.
त्याचबरोबर अभिनयाचा विचार केला तर प्रत्येक कलाकार आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देताना दिसतो. प्रत्येकाने आपापली व्यक्तिरेखा चांगली निभावली आहे, त्याचा परिणाम म्हणजे तो चित्रपट खूप मजबूत बनतो. चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनय म्हणजे पंकज त्रिपाठी, ज्यांचा हैदराबादी उच्चार जबरदस्त आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तुम्हाला रणवीर सिंहमध्ये कपिल देवची झलक नक्कीच पाहायला मिळेल. याशिवाय प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट काम केले आहे. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांमध्ये अधिकच उत्साह भरतात.
Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?
Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!